---Advertisement---

मानलं तुला भावा! कोरोनाशी लढा दिला, पहिला सामन्याला मुकला; आता शतक करत आयपीएलचा ‘हिरो’ बनला

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 12:09 PM
Devdutt Padikkal
---Advertisement---

आयपीएल 2021 मध्ये गुरूवार (22 एप्रिल) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात आरसीबीचा युवा फलंदाज देवदत्त पड्डीकलने शतकी खेळी साकारली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या 177 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि पड्डीकलने 181 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. यामध्ये पड्डीकलने 52 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा केल्या.

यासह आयपीएल 2021 मध्ये शतक करणारा तो दुसरा फलंदाज आहे. या अगोदर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने पंजाब किंग्जविरुद्ध या सत्रातील पहिले शतक ठोकले आहे. पड्डीकलने ठोकलेल्या या शतकामुळे त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

पड्डीकलसाठी आयपीएल 2021 ची सुरुवात खूप वाईट झाली. कारण स्पर्धा सुरू होण्यापुर्वी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. त्यामुळे तो या स्पर्धेतील आरसीबीच्या पहिल्या सामन्याला मुकला होता. परंतु कोरोनातून सावरून संघात परतल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या दोन्ही सामन्यांत त्याला चांगली खेळी करण्यास अपयश आले. परंतु राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली.

युवा शिलेदारांच्या मोठ्या विक्रमात मिळवलं स्थान
पड्डीकलचे हे आयपीएल कारकिर्दीत पहिले शतक ठरले असून या पहिल्या शतकासह तो आयपीएलच्या इतिहासात शतक ठोकणाऱ्या सर्वात तरुण फलंदाजांच्या यादीत तिसऱ्यास्थानी आला आहे. त्याने हे शतक 20 वर्ष आणि 279 दिवसांचा असताना पूर्ण केले आहे. या यादीत सर्वात अव्वलस्थानी मनीष पांडे असून त्याने 2009 साली आरसीबीसाठी खेळताना 19 वर्ष व 253 दिवसांचा असताना शतक ठोकले होते. तसेच मनीष पांडे आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय देखील आहे.

तसेच या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा वर्तमान कर्णधार रिषभ पंत आहे. पंतने 2018 मध्ये 20 वर्ष 218 दिवसांचे वय असताना आपले पहिले शतक झळकावले होते आणि आता त्यानंतर पडीक्कल तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्यानंतर या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या संजू सॅमसनने 22 वर्ष 151 दिवसांचा असताना 2017 मध्ये तर, पाचव्या स्थानी असलेल्या क्विंटन डी कॉकने 2016 आयपीएलमध्ये 23 वर्ष 122 दिवसांचा असताना आयपीएलमध्ये शतक ठोकले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठ्या मनाचा माणूस! आधी ख्रिस गेल आणि आता देवदत्त पडीक्कल; कोहलीच्या ‘त्या’ कृत्याने चाहते भारावले

बेंगलोरचा राजस्थानवर ‘रॉयल विजय’; चेन्नईला पछाडत गुणतालिकेत पुन्हा ‘या’ स्थानी झाले विराजमान

‘माझे शतक नव्हे संघाचा विजय महत्त्वाचा,’ सामनावीर पडीक्कलच्या वक्तव्याने जिंकली सर्वांचे मने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---