---Advertisement---

कोहलीच्या चेल्याची कमाल! टी२० पदार्पणात स्लॉग स्वीप शॉट खेळत लगावला गगनचुंबी षटकार

On: गुरूवार, जुलै 29, 2021 9:47 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या टी-२० सामन्यात ४ युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. यापैकीच एक नाव म्हणजे देवदत्त पडिक्कल. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या पडिक्कलला या सामन्यात मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. परंतु त्याने या खेळी दरम्यान एक षटकार लगावला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्त पडिक्कलला तुम्ही मोठमोठे फटके खेळताना पाहिलं असेल. त्यामुळे अनेकांनी तो पदार्पणाच्या टी-२० सामन्यात तो मोठी खेळी खेळणार अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु तो अवघ्या २९ धावा करत माघारी परतला होता.

या दरम्यान त्याच्या बॅटमधून आलेला टी-२० कारकिर्दीतील पहिला षटकार पाहण्यासारखा होता. त्याने ११ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जोरदार प्रहार करत स्लाॅग स्वीप शॉट खेळला. या शॉटचा टायमिंग इतका अचूक होता की, चेंडू बॅटला लागताच तो मिडविकेट बाऊंड्रीच्या बाहेर गेला होता.(Devdutt padikkal Hits the first six of his international career ,watch video)

भारतीय संघाच्या ५ बाद १३२ धावा
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ४० धावांचे योगदान दिले होते. तर आपला पहिलाच टी-२० सामना खेळत असलेल्या देवदत्त पडिक्कलने २९ धावांचे योगदान दिले होते. तसेच सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाडने २१ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. या सामन्यात भारतीय संघाला २० षटक अखेर ५ बाद १३२ धावा करण्यात यश आले होते.

श्रीलंका संघाचा जोरदार विजय
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाकडून धनंजय डी सिल्वाने अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ४० धावांची खेळी केली. तसेच मिनोद भानुकाने ३६ धावांचे योगदान देत हा सामना श्रीलंका संघाला ४ गडी राखून जिंकून दिला. यासह ही मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकापूर्वी बिघडला हार्दिकचा फॉर्म, दिग्गजाने ‘या’ दोघांना अष्टपैलू म्हणून तयार करण्याचा दिला सल्ला

फलंदाजीत फ्लॉप ठरलेला संजू यष्टीमागेही फेल, कर्णधार धवनला करायला लावली ‘मोठी चूक’!

श्रीलंंकेच्या सलामीवीराची विकेट भुवीसाठी ठरली विक्रमी, पूर्ण केले टी२० विकेट्सचे ‘अर्धशतक’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---