---Advertisement---

नादच खुळा! विजय हजारे ट्रॉफीत देवदत्त पड्डीकलचं सलग चौथं शतक; ‘रनमशीन’ची केली बरोबरी

---Advertisement---

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफी २०२०-२१ अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेचा दुसरा क्वार्टर फायनल सामना सोमवारी (०८ मार्च) कर्नाटक विरुद्ध केरळ संघात पार पडला. दिल्ली येथे झालेल्या या सामन्यात कर्नाटकचा युवा सलामीवीर देवदत्त पड्डीकलने झुंजार शतक लगावले. या शतकासह त्याने विजय हजारे ट्रॉफीतील मोठ्या विक्रमाची आपल्या नावे नोंद केली आहे.

पहिल्या विकेटसाठी २४९ धावांची भागिदारी 

कर्नाटक संघाकडून डावाची सुरुवात करताना २० वर्षीय पड्डीकलने वादळी खेळी केली. ११९ चेंडूंचा सामना करताना त्याने १०१ धावा चोपल्या. दरम्यान २ खणखणीत षटकार आणि १० चौकार मारले. सोबतच संघसहकारी आणि कर्णधार रविकुमार समर्थसोबत मिळून पहिल्या विकेटसाठी २४९ धावांची भागिदारी रचली.

विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी

कौतुकास्पद बाब म्हणजे, हे पड्डीकलचे विजय हजारे ट्रॉफीतील पहिलेवहिले नसून सलग चौथे शतक होते. यासह एका हंगामात सर्वाधिक शतके करण्याच्या विक्रमात त्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि रनमशीन विराट कोहलीची बरोबरी केली आहे. यापुर्वी पड्डीकलने ओडिसा, केरळ आणि रेल्वे या संघांविरुद्ध शतक झळकावले आहे. विराटने २००८-०९ या विजय हजारे ट्रॉफी हंगामात सर्वाधिक ४ शतके केली होती.

https://twitter.com/man4_cricket/status/1368820446913646594?s=20

https://twitter.com/man4_cricket/status/1368795599848370176?s=20

अवघ्या ६ सामन्यात ६५० पेक्षा जास्त धावा

याबरोबरच आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफी २०२०-२१ मध्ये ६ सामन्यात पड्डीकलने ६७३ धावा चोपल्या आहेत. यात ४ शतकांसह २ अर्धशतकांचाही समावेश आहे. अर्थातच त्याने प्रत्येक सामन्यात धावांची पन्नाशी पार केली आहे.

विजय हजारे ट्रॉफी कारकिर्दीतील कामगिरी

पड्डीकलच्या आतापर्यंतच्या विजय हजारे ट्रॉफी कारकिर्दीवर नजर टाकायची झाली तर, त्याने २०१९ पासून १८ सामने खेळले आहेत. दरम्यान ५ शतकांच्या मदतीने १२२२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ७ अर्धशतकांचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

व्वा रे व्वा रिषभ! पाकिस्तानी दिग्गजालाही पाडली फलंदाजीची भुरळ; म्हणाले, ‘पंत डाव्या हाताचा सेहवाग’

टीम इंडियातील ‘हा’ अष्टपैलू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ; रवी शास्त्रींनी केलं तोंडभरुन कौतुक

गतवर्षीच्या उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सचं यंदा बदलणार का नशीब? ‘असं’ आहे अय्यरच्या टीमचं पूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---