आयपीएलमध्ये अजून एकही विजेतेपद मिळवू न शकलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २०२१ आयपीएल हंगामातील पहिल्या सामन्यांत मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मात्र, या सामन्यात बेंगलोरच्या देवदत्त पड्डीकलला खेळता आले नव्हते. तो नुकताच कोविड-१९ या आजारातून बाहेर आला आहे. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्यासाठी बेंगलोरने विश्रांती दिली होती. आता पडीक्कलने म्हटले आहे की स्थानिक क्रिकेटमधील जसा उत्तम खेळ केला तसाच तो आयपीएलमध्येही करण्यास इच्छुक आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या ट्विटर अकांउंटवरून बोलताना तो म्हणला की, ‘कोरोना होणे हा एक माझ्यासाठी मोठा धक्का होता. आयुष्यात काही गोष्टींवर आपण नियंत्रण मिळवू शकत नाही. आयपीएलमध्ये आपण पूर्णपणे आपले १०० टक्के योगदान द्यायला हवे, तेव्हाच आपले प्रदर्शन चांगले होते.’
पडीक्कल आता पूर्णपणे बरा झाला असून त्याचे लक्ष आता फक्त सरावावर आहे. त्याने त्याच्या फिटनेसवरही पूर्णपणे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.
देवदत्त पडीक्कलची कामगिरी मागच्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना खूप चांगली झाली होती. त्याने पाच अर्धशतक करताना ५७३ धावांचा पाऊस पाडला होता. तसेच मागील हंगामातील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही त्याने पटकावला होता.
तसेच त्याने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्ध्येत देखील चांगली कामगिरी केली होती. त्यात खेळताना त्याने ६ सामन्यांमध्ये २१८ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने विजय हजारे स्पर्धेत पण सहभाग नोंदवला होता. त्यातील ७ सामन्यात त्याने जवळपास ७३७ धावा केल्या होत्या.
पडीक्कल पुढे म्हणाला की, मागच्या वर्षीची आयपीएल त्याच्यासाठी खास होती. मागच्या वर्षीचा अनुभव चांगला होता. आता आयपीएल २०२१ साठी तो पूर्णपणे तयार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, ‘हा’ दिग्गज कोलकाताविरुद्धच्या सामन्यात खेळणार
वाथी फिवर! धवनने अश्विनला नाचण्यासाठी घातली गळ, शॉ-उमेशने घेतली मजा, पाहा भन्नाट व्हिडिओ






