---Advertisement---

गावसकर धावले एमएस धोनीच्या मदतीला, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 5:26 PM
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात तीन वेळाचा विजेता चेन्नई सुपर किंग्स व एमएस धोनीसाठी चांगली राहिली नाही. चेन्नईला आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून ७ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सवर अनेकांनी टीका केली. त्याचवेळी, भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला उर्वरित आयपीएलसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

सुनील गावसकर यांनी दिला धोनीला सल्ला
हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभव स्वीकारावा लागला. संघाचा कर्णधार एमएस धोनी एकही धाव न करता दुसऱ्याच चेंडूवर युवा वेगवान गोलंदाज आवेश खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. यानंतर, भारताचे सर्वकालीन महान फलंदाज व सध्या आयपीएलमध्ये समालोचकाची भूमिका बजावणारे सुनील गावसकर यांनी धोनीला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा सल्ला दिला आहे.

आयपीएलच्या प्रसारण वाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले, “माझ्या मते, धोनीला फलंदाजीच्या क्रमवारीबाबत निर्णय घ्यावे लागतील. तो खालच्या फळीत फलंदाजीला येतो. त्याला वाटते तो फक्त चार ते पाच षटके फलंदाजी करू शकतो. मात्र, माझ्या मते त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला घेऊन संघाला मार्गदर्शन केले पाहिजे. संघात बरेच तरूण खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सॅम करनही अजून नवखाच आहे.”

गावसकर पुढे बोलताना म्हटले, “धोनी पहिल्या सामन्यात दोन चेंडू खेळून एकही धाव न काढता परतला. मात्र, क्रिकेटमध्ये असे होत असते. ती गोष्ट आपल्या हातात नाही. परंतु, जेव्हा स्पर्धा पुढे जाईल तेव्हा धोनीला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागेल.”

सहा वर्षानंतर शून्यावर बाद झाला धोनी
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला एमएस धोनी मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. तो सध्या केवळ आयपीएलमध्ये खेळत असतो. चौदाव्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. यापूर्वी तो २०१५ आयपीएलवेळी मुंबई इंडियन्सविरुद्ध हरभजन सिंग च्या गोलंदाजीवर शुन्यावर बाद झालेला. धोनी आतापर्यंत खेळलेल्या २०५ आयपीएल सामन्यात केवळ चार वेळा खाते खोलू शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

अनुष्काला सोडून ‘या’ अभिनेत्री सोबत जेट विमानात फिरतोय कोहली! फोटो तूफान व्हायरल

ठरलं तर! ख्रिस गेल खेळणार ‘या’ क्रमांकावर, प्रशिक्षक वासिम जाफरने केला खुलासा

प्रसिद्ध कृष्णाचा घातक बाऊन्सर जोराने लागला फलंदाजाच्या मानेवर अन्… बघा थरारक Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---