---Advertisement---

वाथी फिवर! धवनने अश्विनला नाचण्यासाठी घातली गळ, शॉ-उमेशने घेतली मजा, पाहा भन्नाट व्हिडिओ

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 5:37 PM
---Advertisement---

जगातील सर्वात सुप्रसिद्ध क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात झाली. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत विजय सुरुवात केली. त्याचवेळी या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू मजामस्ती करतानाचा एक व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला गेला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने शेअर केला व्हिडिओ
दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ट्विटर हँडलवरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिखर धवन, रविचंद्रन आश्विन, पृथ्वी शॉ व उमेश यादव दिसत आहेत. हा व्हिडिओ संघाच्या अधिकृत फोटोशूट वेळेचा आहे. या व्हिडीओमध्ये शिखर धवन हा रविचंद्रन अश्विनला ‘वाथी कमिंग’ या गाण्यावर नाचण्यास सांगताना दिसतोय. मात्र, अश्विन त्यासाठी नकारही देत आहे.

या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिल्या गेले आहे की,’ शिखर धवन रविचंद्रन अश्विनना ‘वाथी कमिंग’ गाण्यातील नृत्यासारखे खांदे पाडून नाचण्याची विनंती करत आहे.’

दाक्षिणात्य अभिनेता थलापती विजय याच्या एका चित्रपटातील हे गाणे सध्या चांगलेच चर्चेत असून, सर्वसामान्यांपासून मोठे सेलिब्रिटी या गाण्यावर ताल धरताना दिसून येत आहेत.

https://twitter.com/DelhiCapitals/status/1381479694688731136

दिल्लीने केली आहे विजयी सुरुवात
दिल्ली कॅपिटल्सने नवा कर्णधार रिषभ पंत याच्या नेतृत्वात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची विजय सुरुवात केली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात शिखर धवन व पृथ्वी शॉ यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने १८९ धावांचे आव्हान केवळ तीन गडी गमावत पूर्ण केले. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने यावर्षी यष्टीरक्षक रिषभ पंत दिल्लीचे नेतृत्व करत आहे. दिल्लीचा पुढील सामना १५ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

गावसकर धावले एमएस धोनीच्या मदतीला, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

केकेआरचा ‘हा’ शिलेदार बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा आहे जावई, एका उशीवरुन केलंत पत्नीशी भांडण

अनुष्काला सोडून ‘या’ अभिनेत्री सोबत जेट विमानात फिरतोय कोहली! फोटो तूफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---