आयपीएल 2021 मध्ये रविवार (11 एपिल) रोजी झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यात केकेआर संघाचा सलामी फलंदाज नितीश राणाने शानदार खेळी केली. या सामन्यात त्याने 9 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 56 चेंडूत 80 धावा चोपत सर्वांना आकर्षित केले. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, केकेआरच्या या खेळाडूची आपल्या पत्नी सोबत छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडणे होत असत. एका मुलाखती दरम्यान त्याने स्वतच याचा खुलासा केला.
नितीश राणा आणि त्याची पत्नी सांची मारवाह यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये लग्न केले. सध्या नितीश राणा हा केकेआरचा महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु त्याच्या पत्नीबद्दल फारसे कोणाला माहिती नाही.
सांची ही एक इंटीरियर डिझा़यनर असून दिसायलाही कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सांचीने 2015 मध्ये आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. तीने अंसल विद्यापीठाच्या सुशांत स्कूल ऑफ डिझाईन शाखेतून शिक्षण घेतले असून अनेक नामांकित इंटिरियर डिझाइनर्सकडूनही प्रशिक्षण घेतले आहे.
तसेच राणा हा अभिनेता गोविंदाचा जावई असल्याचे सांगितले जात आहे. कारण कपिल शर्मा कार्यक्रमामध्ये स्वत: नितीश राणा याने अभिनेता गोविंदाशी आपले संबंध असल्याचे कबूल केले होते. कपिलच्या कार्यक्रमात गोविंदाचा पुतण्या कृष्णा अभिषेकने नितीशची पत्नी सांची मारवाह ही त्याची चुलत बहीण असल्याचे सांगितले होते. त्यामुळे नितीश राणा हा त्याचा मेहुणा झाला. या नात्याने राणा गोविंदाचा जावई झाला.
या दोघांच्या फोटोवरून ते एकमेकांवर किती प्रेम करतात हे दिसते. तसेच त्यांची जोडी खूपच सुंदर आहे. सांचीने एका मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा एकमेकांपासून खूप वेगळे होतो. तसेच आमची जीवनशैली आणि आमची पार्श्वभूमीही वेगळी होती. मला पार्टी करायला आवडायचे परंतु नितीश हा घरात बसून राहणारा लाजाळू मुलगा होता. आता परिस्थिति बदलली आहे.”
तसेच त्यांनी छोट्या-छोट्या गोष्टीवरून भांडणे होत असल्याच्या खुलासा केला होता. त्यामध्ये नितीशने त्याच्या घरात असलेल्या झोपायच्या उशी वरून भांडण झाल्याचे सांगितले होता.
तसेच दुसर्या एका मुलाखतीत नितीशने लग्नाआधी तीन वर्षे सांचीचा भाऊ परमवीर आणि नितीशचा भाऊ एकत्र फुटबॉल खेळत असल़्याचे सांगितले होते. क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यानंतर नितीशही त्यांच्याबरोबर तिथे खेळायला जायचा आणि त्या ठिकाणी सांची फिरायला यायची. तो म्हणाला होता की, “मी सांचीला पहिल्यांदा त्या फुटबॉल मैदानावर पाहिले होते. तेव्हा ती परमवीरची बहीण आहे असे कळाले आणि मी तिला पहिल्यांदा मैसेज केला होता. कारण मला सुरुवातीपासूनच प्रेम विवाह करायचा होता.”
महत्त्वाच्या बातम्या-
अनुष्काला सोडून ‘या’ अभिनेत्री सोबत जेट विमानात फिरतोय कोहली! फोटो तूफान व्हायरल
प्रसिद्ध कृष्णाचा घातक बाऊन्सर जोराने लागला फलंदाजाच्या मानेवर अन्… बघा थरारक Video
केन विलियम्सनला KKR विरुद्ध का दिली नाही संधी? संघ प्रशिक्षकाने सांगितले कारण