---Advertisement---

‘मी नेहमी लॉजिकली ऑन द स्टम्प बॉलिंग करतो’; देवेंद्र फडणवीसांची क्रिकेटच्या भाषेत राजकीय फटकेबाजी

On: गुरूवार, मार्च 25, 2021 3:44 PM
---Advertisement---

राजकीय व्यक्ती म्हटले की नेहमीच राजकीय परिभाषेत वाद-प्रतिवाद, संवाद होत असल्याचे आपण पाहतो. परंतू, या व्याख्येला छेद देत क्रिकेटच्या भाषेतही उत्तम राजकीय फटकेबाजी करता येऊ शकते, हे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिले आहे.

भारतीय जनता पक्षाचे मुंबईमधील आमदार कालिदास कोळंबकर यांनी आयोजीत केलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली.

फडणवीस यांनी या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करत थोडा वेळ फलंदाजी देखील केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना फडणवीसांनी क्रिकेटच्या भाषेतच तुफान राजकीय फटकेबाजी केली.

त्यांनी या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘क्रिकेट खेळताना नेहेमी मजाच येते. विशेषतः बॅटिंग करायला मिळाली की अजून मजा येते. मी बॉडी लाईन गोलंदाजी करत नाही. मी योग्य, स्टम्पवर बॉल टाकतो आणि माझा शॉर्ट पिचचा बॉल नसतो. मी योग्य अशाप्रकारे बॉल टाकत असतो, म्हणूनच मला असे वाटते की समोरच्याला तो बॉल खेळताना थोडी अडचण होते.’

फडणवीस हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

चाहत्यांचे प्रेम पाहून वनडे मालिकेतून बाहेर गेलेला श्रेयस अय्यर झाला भावनिक, म्हणाला…

टीम इंडिया पार्टीत व्यस्त तर केएल राहुल बाळाला…, भारतीय दिग्गजाने ‘अशी’ घेतली मजा

कसा आहेस भावा? रिषभच्या प्रश्नावर रोहितचा अश्लील इशारा; व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---