न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेने धमाकेदार फलंदाजी करत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्याच्या पहिल्याच डावात त्याने इंग्लंडसमोर त्यांच्याच घरच्या मैदानावर द्विशतक झळकावले. लॉर्ड्स येथे त्याने पदार्पणातील सर्वोत्तम खेळी खेळली आणि पदार्पणात षटकारासह दुहेरी शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. या शानदार कामगिरीशिवाय त्याने एक नकोसा विक्रम देखील आपल्या नावे केला. हा विक्रम तो लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न करेल.
इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात पहिला कसोटी सामना खेळणार्या कॉनवेने २०० धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ ३७८ धावा काढून सर्वबाद झाला. कॉनवेने संघाच्या एकूण धावसंख्येच्या ५२ टक्के धावा काढल्या. हेन्री निकोल्सने १७५ चेंडूत ६१ धावा करून त्याला सुयोग्य साथ दिली.
एकीकडे पदार्पण कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या या सलामीवीरने दुहेरी शतक झळकावले. ३४७ चेंडूंचा सामना करत त्याने २२ चौकार आणि १ षटकार ठोकला. मात्र याचबरोबर त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही जोडला गेला. कॉनवे कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या डावात षटकारासह दुहेरी शतक पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला.
पदार्पणात इतकी मोठी खेळी खेळल्यानंतर धावबाद होणारा जगातील पहिला फलंदाज ठरला. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा ऐडन मार्करम कसोटी सामन्यात पदार्पण करताना ९७ धावांवर धावबाद झालेला. १९६४ मध्ये पाकिस्तानचे अब्दुल कादिर ९५ धावांवर; तर १९७४ मध्ये वेस्ट इंडिजचे गॉर्डन ग्रीनिज ९४ धावा काढून धावबाद झाले होते.
दक्षिण आफ्रिका सोडून आला न्यूझीलंडला
डेवॉन कॉनवे हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे, जिथे त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र दक्षिण आफ्रिकेत अधिक संधी न मिळाल्याने त्याने देश सोडण्याचा निर्णय घेतला आणि ४ वर्षांपूर्वी न्यूझीलंडला आला. न्यूझीलंडमध्ये तीन वर्षे खेळल्यानंतर त्याने न्यूझीलंड संघासाठी आधी टी२० व नंतर वनडे पदार्पण केले. आता तो न्यूझीलंडचा २८१ वा कसोटीपटू बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पदार्पणात ठरले फ्लॉप अन् कायमची झाली सुट्टी, ‘या’ भारतीयांचे पुनरागमन अशक्य!
कधी आनंदात तर कधी दु:खात! असे ५ प्रसंग, जेव्हा खेळाडूंना भर मैदानातच कोसळलं होतं रडू
न्यूझीलंडच्या पदार्पणवीराने घडवला इतिहास, तब्बल १२५ वर्षांपुर्वीचा विक्रम काढला मोडीत






