बांगलादेश संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली गेली. मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने ६५ धावांनी विजय मिळवत मालिका ३-० ने आपल्या नावावर केली आहे. या सामन्यातील डेवोन कॉनवेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यातील दुसऱ्या डावात यष्टीरक्षण करताना डेवोन कॉनवे याने एमएस धोनीची आठवण करून दिली आहे.
तर झाले असे की दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेश संघाला जिंकण्यासाठी १४२ धावांची गरज होती. याच डावातील ६ व्या षटकात अफिफ हुसैन याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसला. डेवोन कॉनवेने अतिशय वेगाने त्याला आणि चपळाईने त्याला यष्टिचित केले. त्यानंतर तिसऱ्या अंपायरची मदत घेतली असता, अंपायरने त्याला बाद घोषित केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच क्रिकेट चाहते आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवत आहेत.
Brilliant work behind the stumps by Devon Conway 🙌#NZvBAN | https://t.co/m2JoVQFNLFhttps://t.co/iXbhBaTV0l
— ICC (@ICC) April 1, 2021
तिसऱ्या सामन्यात पावसामुळे सामना १०-१० षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाहुणे संघाच्या दिशेने लागला होता. नाणेफेक जिंकून त्यांनी यजमानांना प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. आमंत्रणाला मान देत संघाने न्यूझीलंड संघाने १० षटकात १४१ धावा केल्या होत्या. यात फिन ऍलन याने अवघ्या २९ चेंडूत सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली होती
बांगलादेश संघाकडून १४२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सलामी फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली नाही. सौम्य सरकार अवघ्या १० धावा करत माघारी परतला. तर मोहम्मद नईम याने सर्वाधिक १९ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कुठल्याही बांगलादेशी फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. बांगलादेश संघाचा डाव ९.३ षटकातच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांना अवघ्या ७६ धावाच करता आल्या.
हा सामना न्यूझीलंड संघाने ६५ धावांनी आपल्या नावावर केला. यासोबतच ही मालिका देखील ३-० ने आपल्या नावावर केली.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रशिक्षक ते डायरेक्टर ऑफ क्रिकेटर; सर्व आयपीएल फ्रँचायझींचा सपोर्ट स्टाफ माहितीय का? पाहा
का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?
IPL 2021: सर्व आठ संघांमधील एक बळकट आणि एक कमकुवत खेळाडू; घ्या जाणून