टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 (2022 T20 World Cup Super 12) फेरीला 22 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. मुख्य फेरीतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड (AUSvNZ) यांच्यादरम्यान सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने गतविजेते आणि यजमान ऑस्ट्रेलियाला 89 धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडच्या या विजयात सलामीवीर डेवॉन कॉनवे याचे महत्त्वाचे योगदान राहिले. आपल्या 92 धावांच्या नाबाद खेळी दरम्यान अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या न्यूझीलंडसाठी युवा सलामीवीर फिन ऍलनने 16 चेंडूंवर 42 धावांची वादळी खेळी केली. कर्णधार केन विलियम्सन व ग्लेन फिलिप्स हे देखील उपयुक्त योगदान देत माघारी परतले. अखेरीस अष्टपैलू जिमी निशामने 13 चेंडूत 26 धावा ठोकल्या. सलामीवीर कॉनवेने 58 चेंडूंवर 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 92 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंड ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 201 धावांचे लक्ष ठेवण्यात यशस्वी ठरला.
आपल्या या लाजवाब खेळी दरम्यान कॉनवेने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील एका प्रमुख विक्रमाच्या यादीत अव्वल स्थान मिळवले. आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या देशांच्या खेळाडूंतर्फे 26 टी20 डावांमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज होण्याचा मान कॉनवेला मिळाला. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या कॉनवेने 29 सामन्यांच्या 26 डावांमध्ये 57.68 च्या सरासरीने 1033 धावा केल्या आहेत.
या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा आहे. बाबरने आपल्या 26 व्या डावानंतर 1031 धावा बनविल्या होत्या. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या डेव्हिड मलानने 1000 धावांचा टप्पा पार करत 1014 धावा जमविलेल्या. भारताचा विराट कोहली या यादीत चौथ्या क्रमांकावर असून, त्याला 26 डावांनंतर 972 धावा करता आलेल्या. तसेच कॉनवेची 57.68 ही सरासरी देखील 1000 टी20 धावा बनवणाऱ्या कोणत्याही फलंदाजापेक्षा सर्वोत्तम आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महामुकाबल्यातून पाकिस्तानचा हुकमी एक्का बाहेर! टीम इंडियाला दिलेली मोठी जखम
देशांतर्गत क्रिकेट गाजवतोय इशान किशन, ओडिसाविरुद्ध केलेले शतक ठरले ऐतिहासिक