येत्या २०२३ वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत नवी टी२० लीग सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला या लीगपासून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण, दक्षिण आफ्रिका क्रिकेटची विस्कटलेली आर्थिक घडी या लीगमूळे पुन्हा एकदा बसू शकते. आता गुरुवारी (११ ऑगस्ट) या नव्या क्रिकेट दक्षिण आफ्रिका टी२० लीग (सीएसए टी२० लीग) मधील एमआय केपटाउन संघाने करारबद्ध केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये डेवाल्ड ब्रेविस याचाही समावेश आहे.
‘बेबी एबी’ नावाने ओळखला जाणाऱ्या १९ वर्षीय ब्रेविसला (Dewald Brevis) मुंबईच्या मालकीच्या एमआय केपटाउन (MI Capetown) संघाने करारबद्ध केले आहे. अशाप्रकारे ब्रेविस आता मुंबईच्या २ वेगवेगळ्या फ्रँचायझींकडून २ वेगवेगळ्या टी२० लीगमध्ये खेळताना दिसेल. त्याने २०२२ आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई संघात पदार्पण केले होते. या पदार्पणाच्या हंगामात ७ सामने खेळताना १६१ धावा काढत त्याने सर्वांना प्रभावित केले आहे. यानंतर आता मुंबईच्या मालकीच्या आणखी संघाचे प्रतिनिधित्त्व करताना दिसेल.
एमआय केपटाउन आणि मुंबई इंडियन्स या दोन्हीही संघांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटद्वारे याबद्दल माहिती दिली आहे.
Our #OneFamily bond, 𝗗ou𝗕le as strong now! Welcome to @MICapetown, @BrevisDewald 💙
🗞️ Read more: https://t.co/ZUDvQqB1DM#MIcapetown @OfficialCSA pic.twitter.com/ShE5wkLvnO
— Mumbai Indians (@mipaltan) August 11, 2022
दरम्यान या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार असल्याची माहिती स्पर्धेचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी दिली होती. लिलावापूर्वी प्रत्येक संघ पाच खेळाडूंना करारबद्ध करू शकतो. या पाचपैकी तीन खेळाडू विदेशी, एक दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय व एक अनकॅप्ड खेळाडू असेल. एका संघात १७ खेळाडू असणे आवश्यक आहे.
या नियमानुसार, एमआय केपटाउन संघाने ३ विदेशी खेळाडूंच्या रूपात राशिद खान, लियाम लिव्हिंगस्टोन व सॅम करन यांना करारबद्ध केले आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून कगिसो रबाडा व अनकॅप्ड खेळाडू म्हणून ब्रेविसला संघात घेतले आहे.
2️⃣ 🇿🇦 | 2️⃣ 🏴 | 1️⃣ 🇦🇫
Read more on our first group of players joining @MICapeTown – https://t.co/68DXpU0DNp#OneFamily #MIcapetown @OfficialCSA pic.twitter.com/Ht9f5XgeOy
— MI Cape Town (@MICapeTown) August 11, 2022
दरम्यान या लीगमधील सर्वच्या सर्व सहा संघ आयपीएलच्या संघमालकांनी विकत घेतलेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद व लखनऊ सुपरजायंट्स यांचा समावेश आहे. मुंबईबरोबरच चेन्नईच्या मालकीच्या जोहान्सबर्ग फ्रॅंचाईजीने फाफ डू प्लेसिस व मोईन अली या आयपीएलमधील आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. अनेक वर्ष चेन्नईसाठी खेळल्यानंतर फाफ यावेळी आरसीबीचा भाग बनला होता.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘प्रसिद्धीसाठी खोटं बोलतेस, माझ्या मागे लागू नको’, उर्वशी रौतेलाला रिषभ पंतने ऐकवली खरीखोटी
मुंबईपाठोपाठ सीएसकेची विदेशी टी२० लीगमध्ये गुंतवणूक, ‘या’ नावाने ओळखली जाणार नवी फ्रँचायझी
फिरकीपटूंसाठी मोठी बाधा आहे ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू, आशिया चषकात संधी देण्याची होतीये मागणी