---Advertisement---

‘बेबी एबी’ने लखनऊच्या चमीराला दिवसा दाखवल्या चांदण्या; खाली पाहून चेंडू धाडला बाऊंड्रीच्या पल्याड, VIDEO VIRAL

On: रविवार, एप्रिल 17, 2022 3:53 PM
Dewald-Bravis
---Advertisement---

सध्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या हंगामात एक नाव चांगलंच गाजतंय. ते म्हणजे, डेवाल्ड ब्रेविस होय. दक्षिण आफ्रिकेचा ब्रेविसचे हे आयपीएलचे पहिलेच वर्ष आहे. आपल्या पहिल्याच हंगामात तो मुंबई इंडियन्सकडून दमदार कामगिरी करताना दिसतोय. त्याची वादळी खेळी पाहून चाहत्यांनी त्याला ‘बेबी एबी’ हे नाव दिले आहे. त्यामुळे आता सर्वजण त्याला त्याच नावाने बोलावतात. शनिवारी (दि. १६ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात ब्रेविसने आपल्या फलंदाजीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यादरम्यान त्याने १३ चेंडूंचा सामना करताना ३१ धावांची आतिषी खेळी केली. यादरम्यान त्याने एक जोरदार षटकार मारला. या षटकाराला चाहते ‘नो लूक सिक्स’ म्हणत आहेत, ज्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

चमीराच्या चेंडूवर न बघता भिरकावला षटकार
लखनऊविरुद्धच्या (Lucknow Super Giants) सामन्यात फलंदाजी करताना मुंबईच्या (Mumbai Indians) डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Bravis) डावाच्या पाचव्या षटकात श्रीलंकन गोलंदाज दुष्मंथा चमीराला (Dushmantha Chameera) निशाणा बनवले. त्याने चमीराच्या चौथ्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने जोरदार षटकार भिरकावला. यानंतर पुढील चेंडूवर चमीराने बाऊंसर टाकला, जो यष्टीरक्षकाला चकवत चौकार गेला. या चेंडूवर मुंबईला पाच धावा मिळाल्या. यानंतर ब्रेविसने बॅकवर्ड पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला चौकाराच्या दिशेने पाठवले. षटकाचा शेवट त्याने मिडऑफच्या दिशेने चौकारासह केला. अशाप्रकारे मुंबईला २० धावा मिळाल्या.

https://twitter.com/Peep_at_me/status/1515315002051534851?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1515315002051534851%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fipl-2022-baby-ab-dewald-brevis-hits-another-no-look-beauty-during-his-rampant-13-ball-31-eng-great-tags-him-as-best-young-player-ive-seen-hindi-2894527

आवेश खानच्याही गोलंदाजीवर चोपल्या धावा
यानंतर आवेश खानच्या पहिल्या चेंडूवर इशान किशनने एक धाव घेत स्ट्राईक ब्रेविसला दिली. त्याने या षटकातील दुसरा चेंडूही मिड-विकेट आणि मिड-ऑनच्या मध्ये स्वीप करून चौकारासाठी पाठवला. यानंतर पुढचा चेंडू सरळ पंचाच्या दिशेने चौकारासाठी गेला. चेंडू इतक्या वेगाने आला की, पंचही थोडक्यात बचावले आणि चेंडू चौकाराच्या दिशेने गेला. चौथ्या चेंडूवर ब्रेविस धाव घेऊ शकला नाही. मात्र, ऑफ स्टंपच्या बाहेर फेकलेला पाचवा चेंडू ब्रेविसने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला, जो दीपक हुड्डाने झेलला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

मुंबई इंडियन्सला पुनरागमन करून दिले, पण सामना गमावला
यासोबतच १८वर्षीय ब्रेविसच्या १३ चेंडूत ३१ धावांच्या शानदार खेळीचा शेवट झाला. यादरम्यान त्याने १ षटकार आणि ६ चौकार मारले. ब्रेविसने आपल्या या खेळीच्या जोरावर मुंबईला रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चांगली सुरुवात करून दिली. ब्रेविस तंबूत परतला, तेव्हा मुंबईची धावसंख्या ५.५ षटकात २ विकेट्स गमावत ५७ धावा होती. तसेच, ते २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ८ विकेट्स गमावत फक्त १८१ धावाच करू शकले. त्यामुळे त्यांनी हंगामातील सलग सहावा सामना गमावला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

लईच चोपलं राव! दिल्लीविरुद्ध एकाच षटकात दिनेश कार्तिकने पाडला धावांचा पाऊस; ‘ऑरेंज कॅप’धारी बटलरलाही पछाडलं

विराट बनला सुपरमॅन! हवेत झेप घेत एका हाताने पकडला पंतचा अफलातून कॅच; पाहून अनुष्काही झाली खुश

IPL2022| गुजरात वि. चेन्नई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---