कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंका संघाकडून धनंजय डी सिल्वाने नाबाद ४० धावांची खेळी करत श्रीलंका संघाला ४ गडी राखून सामना जिंकून दिला. या खेळीच्या जोरावर त्याला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला आहे.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ५ बाद १३२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना धनंजय डी सिल्वाने ३४ चेंडूंमध्ये एक चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने नाबाद ४० धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार स्वीकरताना तो म्हणाला, “आम्ही या विजयाची आतुरतेने वाट पाहत होतो. मला आनंद होत आहे की, मी श्रीलंका संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मी या सामन्यात हाच विचार करत होतो की, हा सामना जिंकायचा असेल तर मला शेवटपर्यंत फलंदाजी करावी लागेल. त्यामुळे आम्ही आज शेवटपर्यंत लढा सुरूच ठेवला होता. भारतीय संघाविरुद्ध खेळणे खूप कठीण असते.” (Dhananjay d silva got man of Match award for his match winning 40 runs knock against India in 2nd T20I)
आज होणार निर्णायक लढत
दोन्ही संघांमध्ये पहिल्या २ सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार प्रत्युत्तर देत ४ गडी राखून विजय मिळवला आहे. ३ टी-२० सामन्यांची मालिका आता १-१ ने बरोबरीत आहे.
त्यामुळे आज (२९ जुलै) होणारा तिसरा टी-२० सामना निर्णायक सामना ठरणार आहे. या सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या सामन्यातील पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरणार. तर श्रीलंका संघाला देखील ही मालिका २-१ ने आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. हा सामना आज (२९ जुलै) संध्याकाळी ८ वाजता कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: विकेट मिळाल्याने चाहरचे डोळे दाखवत आक्रमक सेलिब्रेशन, लंकन फलंदाजानेही टाळ्या वाजवत…
कोहलीच्या चेल्याची कमाल! टी२० पदार्पणात स्लॉग स्वीप शॉट खेळत लगावला गगनचुंबी षटकार