---Advertisement---

युझीसोबत धोका? श्रेयस आणि धनश्रीला एकत्र पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, ‘चहलला न्याय…’

On: शनिवार, एप्रिल 8, 2023 6:46 PM
Yuzvendra-Chahal
---Advertisement---

क्रिकेटविश्वातील रोमँटिक जोडप्यांमध्ये युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नावाचा समावेश होतो. हे दोघेही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असतात. युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमी वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. यात फोटो आणि व्हिडिओंचाही समावेश आहे. मात्र, सध्या हे जोडपे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.

खरं तर, सोशल मीडियावर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची पत्नी धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर (Dhanashree Verma And Shreyas Iyer) यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो स्वत: धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत धनश्रीसोबत तिच्या मैत्रिणी आणि भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हादेखील दिसत आहे. त्यामुळे आता चाहते या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://twitter.com/dudeitsokay/status/1644590803745112064?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1644590803745112064%7Ctwgr%5E87fdf8f3802449cd14ec3f69271faa1439049bef%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Ftwitter-reaction-on-dhanashree-verma-and-shreyas-iyer-viral-photo-120674

https://twitter.com/Prochoice356/status/1644635106781593601?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1644635106781593601%7Ctwgr%5E87fdf8f3802449cd14ec3f69271faa1439049bef%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Ftwitter-reaction-on-dhanashree-verma-and-shreyas-iyer-viral-photo-120674

ट्विटरवर एका युजरने धनश्री आणि श्रेयसच्या फोटोवर प्रतिक्रिया देत लिहिले की, “चहल भावासाठी न्याय पाहिजे.”

दुसऱ्या एकाने चहलशी संबंधित एक मीम शेअर केले. त्यात लिहिले होते की, “हळूहळू सर्व समजत आहे की, श्रेयस अय्यरने दुखापतग्रस्त होण्याचे नाटक का केले.”

आणखी एकाने असे म्हटले की, “चहल भावा, याची सर्जरी होणार होती ना? हा धनश्रीसोबत काय करतोय?”

https://twitter.com/vigiciann/status/1644576889556615168?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1644576889556615168%7Ctwgr%5E87fdf8f3802449cd14ec3f69271faa1439049bef%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Ftwitter-reaction-on-dhanashree-verma-and-shreyas-iyer-viral-photo-120674

खरं तर, धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर हे चांगले मित्र आहेत. यापूर्वीही दोघे एकमेकांसोबत दिसले आहेत. तसेच, त्यांनी एकमेकांसोबतचे रील्सही शेअर केले आहेत. दुसरीकडे, चहलबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. श्रेयस स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याला पाठीच्या दुखापतीचा त्रास असल्यामुळे तो स्पर्धेत खेळू शकत नाहीये. (dhanashree verma and shreyas iyer viral photo see twitter reaction here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलचा जादू बनतोय बटलर! दिवसाच्या सामन्यांमध्ये उभारतोय धावांचा डोंगर, पाहा जबरदस्त आकडेवारी
सूर्या ते ऋतुराज, MI vs CSK सामन्यात ‘या’ 5 खेळाडूंवर असेल क्रिकेटविश्वाची नजर, पाहा यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---