---Advertisement---

जमतंय जमतंय! धनश्रीच्या तालात ताल मिसळत पंजाबी गाण्यावर थिरकला चहल, व्हिडिओला चाहत्यांची पसंती

---Advertisement---

क्रिकेटर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा अनेकदा तिच्या नृत्याद्वारे सोशल मीडियावर चर्चेत राहताना दिसत असते. पण यावेळी तिने तिच्या व्हिडिओमध्ये पतीचाही समावेश करून चाहत्यांच्या आनंदात भर घातली आहे. धनश्रीने नुकत्याच एक व्हिडिओ सोशल मीडिया पोस्ट केला आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल देखील एकत्र नृत्य करताना दिसत आहे.

या सेलिब्रिटी जोडप्याचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओत ते दोघे पंजाबी गायक हार्दिक संधूच्या ‘क्या बात है’ या लोकप्रिय गाण्यावर एकत्र नाचत आहेत. धनश्री आणि चहल दोघेही या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचे स्वेटशर्ट आणि काळ्या पँट परिधान केलेले दिसत आहेत. पायात त्यांनी पांढरे स्नीकर्स घातले आहेत.

या व्हिडिओमध्ये, दोघेही एकमेकांशी आपआपल्या स्टेप्स जुळवताना सुंदर नृत्य करत आहेत, जे पाहिल्यानंतर चाहते खूष झाले आहेत. या व्हिडिओखालील कमेंट बॉक्स बघितला तर लोकांनी या दोघांच्या नृत्याची खूप प्रशंसा केली आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘तुम्ही दोघे एकत्र छान दिसत आहात.’

https://www.instagram.com/reel/CUrQ69qpif2/?utm_source=ig_web_button_share_sheet

तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘खूप सुंदर’. आणखी एकाने लिहिले आहे की, ‘शेवटी चहल भाईचा नंबर आला तर.’ याचा रोख धनश्रीने याआधी विविध सेलिब्रिटीसोबत केलेल्या व्हिडिओकडे होता.

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा व्यवसायाने डॉक्टर आहे, पण ती एक उत्तम नर्तकी आणि नृत्यदिग्दर्शका आहे. धनश्री दररोज नवीन व्हिडिओ आणि संकल्पनांसह तिचे डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते. त्याचवेळी चाहत्यांनी तिच्याकडे अनेक वेळा मागणी केली होती की, तिने तिचा पती आणि क्रिकेटर चहलसोबत डान्स व्हिडिओ बनवावेत. म्हणून तिने हा व्हिडिओ तयार केला असावा. धनश्री सध्या चहलसोबत यूएईत आहे. चहलची टी२० विश्वचषप स्पर्धेत निवड झाली नव्हती तेव्हा, धनश्रीने त्याला हुरूप देत भावनिक पोस्ट केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

सीएसकेच्या ‘या’ क्रिकेटरची लागणार लॉटरी, धोनी स्वत: मिळवून देणार राखीव खेळाडूंमधून मुख्य संघात जागा!

क्रिकेटपटू, यष्टीरक्षक आणि कर्णधारानंतर एमएस धोनी दिसणार अभिनेत्याच्या भूमिकेत? दिले ‘असे’ उत्तर

‘आऊट ऑफ फॉर्म’ इशानचे राजस्थानविरुद्ध ‘रॉयल’ कमबॅक, प्रेयसीचे टीकाकारांना तिखट प्रत्युत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---