भारतीय क्रिकेट संघाचा युवा प्रतिभावान फिरकीपटू युझवेंद्र चहल त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. काही दिवसांपूर्वी धनश्री वर्मा हिच्याशी त्याचा साखरपुडा पार पडला होता. धनश्री ही उत्तम डांसर आहे आणि सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. तिच्या उत्कृष्ट नृत्य कौशल्यामुळे चाहत्यांनी या व्हिडिओला मोठ्या संख्येने पसंत केले होते. आता तिने तिच्या डान्सचा पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
बॉलीवूडमधील गाण्यावर थिरकली धनश्री
नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धनश्री ‘ए दिल है मुश्किल’ या बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपटातील ‘क्यूटिपाय’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओला तब्बल 6 लाखांपेक्षाही अधिक लोकांनी लाईक केले आहे.
चाहत्यांना केले आवाहन
“तुमचे स्वतःचे आवडते व्हिडिओ मला पाठवा आणि मी ते माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करेन.” असे आवाहनही धनश्रीने चाहत्यांना केले आहे.
https://www.instagram.com/p/CIaA0wNJcrJ/?utm_source=ig_web_copy_link
धनश्री आहे कोरिओग्राफर
धनश्री कोरिओग्राफरही आहे. तिने यापूर्वीही काही व्हिडिओ शेअर केले होते ज्यामध्ये ती इतर मुला-मुलींना डांस शिकवताना दिसली.
आयपीएलममध्येही दिसली धनश्री
आयपीएल 2020 मध्ये युझवेंद्र चहल हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला. त्याचे समर्थन करण्यासाठी धनश्रीने स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शवली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
शार्दुलचा राग अनावर! आक्रमक फलंदाज मॅक्सवेलचा झेल सोडताच केला अपशब्दांचा वापर, पाहा Video
‘हम तो उड गए’, पॅरासिलिंग करतानाचा व्हिडिओ केला सचिनने शेअर
धडकी भरवणारा क्षण! कार्तिक त्यागीचा चेंडू लागला पुकोवस्कीच्या डोक्याला, अन् पुढे काय झालं पाहाच…
ट्रेंडिंग लेख-
शंभर शतके ठोकणाऱ्या सचिनला आवडतात स्वतःच्या ‘या’ तीन खेळ्या; दुसरी आहे खूपच खास
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’






