धर्मशाला स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 117 धावा केल्या आहेत (T 20 series IND vs SA). या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
भारतासाठी गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग (Arshdeep singh) आणि वरुण चक्रवर्ती (Varun chakrawarthy) तसेच हर्षित राणा (Harshit Rana) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करायला लावला. या तिघांनीही प्रत्येकी दोन विकेट्स (विकेट्स) घेतल्या. तसेच, ‘बर्थडे बॉय’ कुलदीप यादवने (Kuldeep yadav) देखील 2 विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आतापर्यंत योग्य ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 11 फलंदाजांपैकी केवळ 3 फलंदाजच दहाचा आकडा पार करू शकले.
एडन मार्करम (Aiden Markram) याने सर्वाधिक 61 धावा केल्या. डोनोवन फरेरा (Donovan Ferreira) याने 20 धावांचे योगदान दिले. एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) याने 12 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त अन्य कोणताही फलंदाज 10 धावांचा आकडा गाठू शकला नाही.





