इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२२ मध्ये रॉयल चॅेलेंजर्स बेंगलोर (आरसीबी)चा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने दिमाखदार प्रदर्शन केले आहे. त्याचनंतर त्याने ९ जूनपासून सूरु झालेल्या भारत-दक्षिण अफ्रीका टी-२० मालिकेमध्ये ३ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात स्थान मिळवले. याचप्रकारे आयपीएल २०२२ मध्ये समालोचनामध्ये आपला हात आजमावून पाहणारा मुंबईच्या संघातील वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने भारतीय संघामध्ये पुरागमन करुन खेळण्याची अपेक्षा दर्शवली आहे.
२०१९च्या विश्वचषक स्पर्धेनंतर दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. २०२०मध्ये आलेल्या कोविड-१९च्या महामारीमुळे भारतात कोणतेही क्रिकेटचे सामने झाले नाही. त्यामुळे इंग्लंडमध्ये जाऊन कार्तिकने आधी द हंड्रेड आणि नंतर त्या दरम्यान इंग्लंडच्या सुरू असणाऱ्या मालिकांमध्ये कॉमेंट्री करण्यास सुरूवात केली. मात्र २०२२ मधील प्रशंसनीय कामगिरी करत भारतीय संघामध्ये वापसी केली आहे. अशीच काहीशी अपेक्षा धवल कुलकर्णीने (Dhawal Kulkarni) एका मुलाखतीत बोलुन दाखवली आहे.
धवल कुलकर्णी म्हणाला की, “हे माझे पहिले वर्ष जेव्हा कोणत्याही आयपीएल संघाने लिलावात मला घेतले नाही. हा माझ्यासाठी एक खुप मोठा झटका होता. मानसिकरित्या मी स्वता:ला सकारात्मक ठेवण्यासाठी आयपीएलमध्ये समालोचन केले. माझा तो अनुभव फार छान राहिला. आयपीएल महाराष्ट्रात हाेत असल्यामुळे मुंबईचे मैदान सरावासाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे मला जसाजसा आयपीएलमधून वेळ मिळत होता तसतसा मी सराव करत राहीलो. आणि माझे हे प्रयत्न मी वाया जाऊ देणार नाही. मला पुर्ण विश्वास आहे की, मी भारतीय संघामध्ये पुरागमन करुन प्रतिनिधीत्व करु शकतो.”
दरम्यान, धवलने भारताकडुन आजवर एकुण १४ सामने खेळले आहेत. त्यात १२ एकदिवसीय आणि २ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. धवलने खेळलेल्या १२ एकदिवसीय सामन्यात २६.७४ च्या सरासरीने १९ बळी घेतले तर २ टी-२० सामन्यात ६.८८च्या ईकॉनॉमी रेटने आणि १८.३३च्या सरासरीने ३ बळी घेतले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माजी भारतीय क्रिकेटरनेच इंडियन टीमवर उभे केले प्रश्न, प्रशिक्षक द्रविडलाही दिला सल्ला
अगग! पाकिस्तानचे फलंदाज विंडीजच्या ‘कामचलाऊ’ गोलंदाज पूरनपुढे नतमस्तक, एक-दोन नव्हे चौघे तंबूत