इंडियन प्रीमीयर लीगच्या 13 व्या हंगामातून यंदा चेन्नई सुपर किंग्ज संघ सर्वात आधी बाहेर पडला. पण असे असले तरी हा संघ अजूनही चर्चेत आहे. नुकताच या संघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी, फाफ डू प्लेसिससह अन्य खेळाडू मस्ती करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्ज संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. चेन्नईचा गोलंदाज कर्ण शर्माच्या वाढदिवसाचा हा व्हिडिओ असून यात धोनी कर्ण शर्माला केक चारल्यानंतर मोनू कुमारला उचलून घेत आहे. त्यात त्याला डू प्लेसिसनेही मदत केलेली दिसते. यावेळी धोनी आणि डू प्लेसिसने उचललेल्या मोनूच्या चेहऱ्याला शार्दुल ठाकूरने पूर्णपणे केकने माखवले.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1324268095511302144
चेन्नईसाठी ठरला निराशाजनक हंगाम
चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी 2020 आयपीएल हंगाम हा विसरण्यासारखा हंगाम आहे. त्यांना 14 सामन्यांपैकी केवळ 6 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे त्यांना आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफ न खेळताच बाहेर पडावे लागले. केवळ चेन्नईसाठीच नाही तर धोनीसाठीही हा हंगाम खास ठरला नाही. त्याला पहिल्यांदाच आयपीएलच्या हंगामात एकही अर्धशतक करता आलेले नाही.
पण असे असले तरी या संघाकडून डू प्लेसिस, सॅम करन आणि ऋतुराज गायकवाड यांनी शानदार कामगिरी केली. हीच यंदाच्या आयपीएल हंगामातील चेन्नईसाठी सकारात्मक बाजू राहिली.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2020- विराट कोहलीच्या RCB समोर वॉर्नरच्या SRHचे आव्हान; कोणाचा प्रवास थांबणार?
मुंबई इंडियन्स फायनलमध्ये गेल्यानंतर रोहित शर्मा भलताच खुश, म्हणाला…
Video: …आणि त्याने चेंडू खाली पडूच दिला नाही; पाहा राहुल चाहरने घेतलेला अवघड झेल






