भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याची काही विशेष ओळख सांगण्याची गरज नाही. क्रिकेटच्या मैदानावरील यशाची सर्व शिखरे पादाक्रांत केलेला धोनी भारतीय क्रिकेटमधील तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक नामांकित खेळाडू म्हणून क्रिकेटविश्वाला ज्ञात आहे. आपल्या अचाट कामगिरीने धोनीने मैदानावर असे काही विक्रम बनवले जे आजतागायत कोणालाही सहजासहजी तोडणे शक्य झाले नाही. त्याचप्रमाणे मैदानाबाहेरही त्याच्या नावाची किती चलती आहे याचा अंदाज सर्वांनाच आहे. अशाच प्रकारे धोनीची एक बॅट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक महागडी बॅट म्हणून देखील ओळखली जाते.
त्या बॅटला मिळाली सर्वाधिक किंमत
भारतीय क्रिकेट संघाने तब्बल २८ वर्षानंतर २०११ मध्ये वनडे विश्वचषक आपल्या नावे केला. श्रीलंकेला हरवत भारतीय संघाने ही कामगिरी केली होती. या विश्वचषकातील अखेरचा फटका धोनीने खेळला. भारताला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता असताना त्याने षटकार ठोकत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हा षटकार मारण्यासाठी धोनीने वापरलेली बॅट हीदेखील एक विश्वविक्रम करून गेली.
विश्वचषकाच्या काही महिन्यानंतर या बॅटचा लिलाव करण्यात आला होता. अवगत माहितीनुसार, ग्लोबल शेयर अँड सिक्योरिटी लिमिटेड या कंपनीने ही बॅट तब्बल १६१,२९५ डॉलर्स म्हणजेच एक कोटी २० लाख रुपयांना विकत घेतली होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार हा एक विश्वविक्रम आहे. यामधून मिळालेला निधी समाजकार्यासाठी वापरण्यात आला होता.
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे धोनी
एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्व आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे केल्या आहेत. २००७ मध्ये टी२० विश्वचषक, २०११ मध्ये वनडे विश्वचषक व २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाने पटकावली होती. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो सध्या केवळ आयपीएलमध्ये सहभागी होतो.
महत्त्वाच्या बातम्या –
अफलातून! न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने डाइव्ह मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ
क्रिकेट ब्रेकिंग! बीसीसीआयकडून भारत-श्रीलंका मालिकेच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब; पाहा नवे टाईमटेबल
पाकिस्तानी अंपायरने चुकीचा निर्णय देऊन देखील ‘लिटल मास्टर’ने मोडला होता ब्रॅडमन यांचा विक्रम