---Advertisement---

एमएस धोनीची मुलगी झिवा दिसणार ‘या’ जाहिरातीमध्ये ?

On: रविवार, जानेवारी 3, 2021 11:42 AM
---Advertisement---

‘कॅप्टनकूल’ एमएस धोनी सध्या क्रिकेटपासून दूर असल्याने, तो काय करतोय या संदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत असते. मागील काही दिवसात वेगवेगळ्या बातम्या समोर येत असून त्यानुसार धोनी आधुनिक शेती करत असल्याचे मानले जात आहे. यादरम्यानच बातमी समोर येत आहे की धोनी आपली मुलगी झिवासोबत जाहिरातीमध्ये दिसणार आहे .

माध्यमांतील वृत्तांनुसार धोनीची मुलगी झिवा धोनी जाहिरांतींमध्ये आपला डेब्यू करू शकते. सेलिब्रिटी फोटोग्राफर वायरल भयानीच्या मते, झिवा धोनी आपल्या वडिलांसोबत ओरिओ बिस्कीटच्या जाहिरातीमध्ये दिसू शकते. जर असे झाले तर ही झिवाची पहिलीच जाहिरात असेल.

ओरिओने देखील मागील काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. ओरिओने इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये लिहले, “अंदाज लावा आपल्या परिवारासोबत कोण जोडणार आहे ते. कर्णधार आणि उपकर्णधार या खेळासाठी येणार आहेत.” या पोस्टमुळे अंदाज बांधला जात आहे की धोनी जाहिरातीमध्ये असू शकतो, मात्र अजूनही अधिकृत वृत्त हाती आलेले नाही.

https://www.instagram.com/p/CJbENNtKNZn/

धोनी जाहिरात क्षेत्रांमध्ये सर्वात आघाडीच्या खेळाडूंपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेवूनही धोनी जाहिरात क्षेत्रात सुप्रसिद्ध आहे. आता पुढील काळात धोनी थेट आयपीएल 2021 मध्येच मैदानात खेळताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

पुजारा, पृथ्वी शॉ आणि मॅथ्यू वेड झाले दुखापतग्रस्त, तिघांबाबत होते ‘हे’ साम्य

लवकर बरा हो दादा! आंतरराष्ट्रीय सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनाईकने ‘अशी’ केली गांगुलीसाठी प्रार्थना, ट्विट व्हायरल

अँजिओप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, कोरोना चाचणीबाबत डॉक्टरांकडून मोठी माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---