सोमवारी (१९ एप्रिल) आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने विजय आपल्या नावे केला. चेन्नईचा हा स्पर्धेतील दुसरा विजय आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी एक भावनिक घटना घडली.
घडली अशी घटना
वानखेडे मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या धोनीला दुसर्या चेंडूवर डाईव्ह मारुन बाद होण्यापासून वाचावे लागले. ज्यामुळे चाहत्यांच्या डोळ्यांसमोर २०१९ च्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्याची आठवण ताजी झाली. राहुल तेवतिया चेन्नईच्या डावातील १५ वे षटक टाकत होता. षटकातील दुसर्या चेंडूवर धोनीने एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा तो थोडा पुढे गेला तेव्हा क्षेत्ररक्षकने चेंडू पकडला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला.
जडेजाने धोनीला धाव घेण्यास मनाई केली आणि तो स्टंपकडे परत गेला. थ्रो सरळ संजू सॅमसनच्या हातात आला आणि काही क्षण असे वाटले की धोनी धावबाद झाला . मात्र, यावेळी धोनीने २०१९ च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या वेळी त्याच्याबरोबर घडलेली चूक पुन्हा केली नाही. धोनीने डाईव्ह मारून धावचीत होण्यापासून स्वतःला वाचवले.
https://twitter.com/lodulalit001/status/1384168422871683075
विश्वचषकात घडलेली ही घटना
धोनीने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१९ च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तेथे धोनी २ धावा घेण्याच्या प्रक्रियेत मार्टिन गुप्टिलच्या थेट फेकीचा बळी ठरला होता. जेथे धोनी क्रीजपासून एक इंच अंतरावर राहिला आणि भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. निवृत्तीनंतर धोनीने बोलताना म्हटलेले की, “उपांत्य सामन्यात दुसरी धाव घेण्यासाठी मी डाईव्ह मारली नाही, ही गोष्ट मला आयुष्यभर बोचत राहिल.”
https://twitter.com/MSDpuli7/status/1384194782403067907
https://twitter.com/imshiva666/status/1384181867486740481
This is how you dive to save your Wicket
Wish he would have done this back in 2019 worldcup knockouts#CSKvRR #Cricket #Dhoni pic.twitter.com/96UjzePNrb
— PRATHAMESH SONTAKKE ❤️✍️ (@Prathamesh_0710) April 19, 2021
धोनी या हंगामातील पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. मात्र, या सामन्यात त्यांनी आपल्या फलंदाजीची छोटीशी झलक दाखवली. त्याने १७ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १८ धावा बनविल्या. युवा गोलंदाज चेतन सकारियाने त्याला बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
हे काहीतरी वेगळंच! संजू सॅमसनने पुन्हा एकदा टॉसनंतर नाणे उचलून ठेवले स्वत:कडेच, पाहा व्हिडिओ
संधी असतानाही आंद्रे रसलने जेमिसनला रनआऊट न करण्यामागे ‘हे’ होते कारण?
आनंदाची बातमी! मुरलीधरनवरील शस्त्रक्रिया यशस्वी, लवकरच मिळणार डिस्चार्ज