आयपीएल २०२१ चा ३५ वा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) यांच्यात शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात नाणेफेक वादळामुळे ७ वाजण्याऐवजी ७:३० वाजता झाली आणि सामना १५ मिनिटांच्या विलंबाने सुरू झाला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने सीएसकेविरुद्ध २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या आणि सीएसकेला विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य दिले. सीएसकेने १८.१ षटकांत १५७ धावा केल्या आणि सामना ६ गडी राखून जिंकला.
सीएसकेच्या विजयानंतर गंभीर होतोय ट्रोल
सीएसकेने या सामन्यात सफाईदार विजय मिळवल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर भारतीय संघाचा माजी सलामीवीर व समालोचक गौतम गंभीर याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने एका प्रसिद्ध चित्रपटातील मीम शेअर करत ‘गंभीर हा कोहली आणि धोनी यांच्यातील संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करत असताना’ असे कॅप्शन दिले.
https://twitter.com/Being_Humor/status/1441405335483281413?s=19
दुसऱ्या एका चाहत्याने सीएसकेला विजयासाठी सहा धावा शिल्लक असतानाचे छायाचित्र पोस्ट करत लिहिले,
‘गंभीर वगळता सर्वाना वाटते की धोनीने षटकार मारून विजय मिळवून द्यावा’
https://twitter.com/trippymaymay/status/1441458103912968195?s=19
अन्य एका चाहत्याने २००७ टी२० विश्वचषकविजेत्या भारतीय संघाचे छायाचित्र पोस्ट करत लिहिले,
‘धोनीच्या चाहत्यांच्या मते, गंभीरच्या आधार कार्डवर असे छायाचित्र हवे.’
याव्यतिरिक्त ही अनेकांनी गंभीरला सीएसकेच्या विजयानंतर ट्रोल केले.
सीएसके पुन्हा अव्वल स्थानी
या विजयासह सीएसके पुन्हा एकदा गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. त्यांनी दिल्लीला मागे टाकत हे स्थान पटकावले. त्यांना प्ले-ऑफ्समधील आपली जागा निश्चित करण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. दुसरीकडे, आरसीबीची पुढील वाटचाल खडतर होऊ शकते. त्यांना उर्वरित पाच पैकी चार सामन्यात विजय अनिवार्य आहे.






