fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

धोनीच्या निवृत्तीबद्दल कर्णधार विराट कोहलीने केले मोठे भाष्य

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. काही वृत्तांच्या मते 2019 विश्वचषकातील भारताची शेवटचा सामना हा धोनीच्या कारकिर्दीतीलही शेवटचा सामना असेल.

त्यामुळे काल(10 जूलै) 2019 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताचा 18 धावांनी पराभव झाल्यानंतर धोनी निवृत्ती घेणार का, या चर्चेला उधान आले आहे. याबद्दल विराट कोहलीने म्हटले आहे की अजून धोनीने त्याच्या भविष्याबद्दल काहीही सांगितले नाही.

धोनीच्या निवृत्तीबद्दल विराट म्हणाला, ‘नाही, त्याने आम्हाला अजून काही सांगितलेले नाही.’

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची आवस्था 5 बाद 71 धावा अशी असताना धोनी फलंदाजीला आला होता. त्यावेळी हार्दिक पंड्या फलंदाजी करत होता. मात्र पंड्याही 32 धावा करुन बाद झाला. त्यामुळे भारताची आवस्था 6 बाद 92 धावा अशी होती.

पण त्यानंतर धोनी आणि रविंद्र जडेजाने सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करत चांगली झूंज दिली. पण हे दोघेही मोक्याच्या वेळी बाद झाले. धोनी 50 धावा करुन धावबाद झाला तर जडेजा 77 धावा करुन झेलबाद झाला. त्यांनतर भारताचा डाव 49.3 षटकात सर्वबाद 221 धावांवर संपूष्टात आला.

तसेच धोनीच्या खेळीबद्दल विराट म्हणाला, ‘मला वाटत धोनी आणि जडेजानंतर भुवनेश्वर फलंदाजीला येणार होता. त्यामुळे एक बाजू सांभाळणे गरजेचे होते. जडेजा चांगला खेळत होता. त्यावेळी तिथे चांगल्या भागीदारीची गरज होती.’

‘त्या परिस्थितीत 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्यासाठी एक बाजू सांभाळणारा कोणीतरी हवा असतो, ते धोनीने केले आणि जडेजाने आज चांगला खेळ केला.’

त्याचबरोबर विराट म्हणाला, ‘बाहेर बसून टीका करणे सोपे आहे. आम्ही आमच्या चूका नाकारत नाही. पण सर्व झाल्यावर आपण वेगवेगळ्या दृष्टीने टीका करु शकतो. मात्र आपण ज्याप्रकारे सामना झाला हे देखील समजून घेतले पाहिजे.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: विलियम्सन म्हणतो, ‘…तर धोनीची न्यूझीलंडच्या संघात निवड करु’

एमएस धोनीने ७व्या क्रमांकावर फलंदाजीला येण्यामागील कोहलीने केले स्पष्ट कारण

भारताला पराभूत करत न्यूझीलंडने सलग दुसऱ्यांदा केला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश

You might also like