---Advertisement---

एमएस धोनीने ७व्या क्रमांकावर फलंदाजीला येण्यामागील कोहलीने केले स्पष्ट कारण

On: गुरूवार, जुलै 11, 2019 2:53 PM
---Advertisement---

मँचेस्टर। 2019 विश्वचषकात काल(10 जूलै) पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 18 धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला.

या सामन्यात 240 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचे पहिले 3 फलंदाज 10 चेंडूंच्या आत बाद झालेले असतानाही भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्याआधी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या यांना फलंदाजीची संधी मिळाली. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली.

पण कोहलीने धोनीला 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याच्या निर्णयाचा बचाव केला आहे. कोहलीने सामन्यानंतर सांगितले की ‘पहिल्या काही सामन्यांनंतर धोनीला अशी भूमीका दिली होती, जिथे तो सामन्यात वाईट परिस्थिती आली तर सामना सांभाळू शकतो. जसे त्याने आज केले. किंवा जिथे सहा किंवा सात षटके उरली असतील आणि तो जाऊन आक्रमक खेळू शकतो.’

या सामन्यात भारतीय संघाने 92 धावांवर 6 विकेट गमावल्यानंतर धोनी आणि रविंद्र जडेजाने सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करत चांगली लढत दिली होती. मात्र धोनी 50 धावा करुन धावबाद झाला तर जडेजा 77 धावा करुन झेलबाद झाला. त्यांनतर भारताचा डाव 49.3 षटकात सर्वबाद 221 धावांवर संपूष्टात आला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताला पराभूत करत न्यूझीलंडने सलग दुसऱ्यांदा केला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश

…म्हणून सौरव गांगुलीने तो खेळाडू मैदानावर आल्यावर व्यक्त केले आश्चर्य

वनडे क्रिकेटच्या इतिहासात अशी गोष्ट पहिल्यांदाच घडली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment