---Advertisement---

थाला मैदानावर उतरला! धोनीने सुरू केली आयपीएलची तयारी; युवा गोलंदाजांसमोर फलंदाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल

On: सोमवार, जानेवारी 26, 2026 10:15 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 (IPL 2026) साठी सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 संपल्यानंतर लगेचच आयपीएलला सुरुवात होणार आहे. 5 वेळा विजेतेपद मिळवणारा चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघही यावेळेस सज्ज झाला आहे. सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनी यानेही मैदानावर उतरून फलंदाजीचा सराव सुरू केला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

26 जानेवारी रोजी सीएसकेने (Chennai super kings) आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एमएस धोनी (Mahendra Singh Dhoni) नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. यावेळी धोनीने सीएसकेचे पारंपारिक पिवळ्या रंगाचे पॅड्स घातले होते. विशेष म्हणजे, नेट्समध्ये त्याने आक्रमक फटकेबाजी न करता मूलभूत (Basic) फलंदाजीवर भर दिला. त्याने बॅक फूट पंच, फ्रंट फूट ड्राइव्ह आणि डिफेन्सचा सराव केला. युवा गोलंदाजांना फारसा त्रास न देता त्याने अत्यंत शांतपणे फलंदाजी केली. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे धोनीने यावेळी पांढऱ्या चेंडूने नव्हे, तर लाल चेंडूने सराव केला.

44 वर्षीय एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, त्याने सीएसकेकडून खेळणे सुरूच ठेवले आहे. 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाल्यापासून तो या संघाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला आहे. आता धोनी ‘येलो आर्मी’साठी फक्त यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून आपली भूमिका चोख बजावत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---