भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या फलंदाजी करताना संघर्ष करत आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टीका केली आहे. तसेच त्याच्या निवृत्तीची चर्चाही रंगत आहेत. पण धोनीला माजी महान फलंदाज सुनील गावस्कार यांनी पाठींबा दर्शवत त्याची 2019 विश्वचषकासाठी भारतीय संघाला गरज असल्य़ाचे म्हटले आहे.
धोनीने भारताला अनेक मोठे विजय मिळवून दिले आहे. तसेच 2007ला टी20 आणि 2011 चा विश्वचषकही भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला आहे. त्याचबरोबर तो यष्टीमागून गोलंदाजांना मार्गदर्शनही करतो. त्याच्या याच गुणांमुळे धोनीचे संघात असणे अपरिहार्य असल्याचे मत गावस्करांनी मांडले आहे.
गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले, “विराटला धोनीची गरज आहे. यात काही शंका नाही. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये खूप वेळ असतो. त्यावेळी धोनी खेळायला येतो.”
“तूम्हाला माहीत आहे, तो क्षेत्ररक्षणातही छोटे बदल करत असतो. गोलंदाजांशी हिंदीमध्ये संवाद साधतो. त्यांना कुठे चेंडू टाकायचा आणि काय करायचे हे सांगतो. ही विराटसाठी चांगली गोष्ट आहे. ”
तसेच गावस्कर पुढे म्हणाले, “धोनी 2019 च्या विश्वचषकासाठी आवश्यक आहे.”
धोनीला विंडीज विरुद्धच्या आणि आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. याबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले, “माझा विश्वास आहे, ज्याप्रमाणे रोहित शर्माही प्रभारी कर्णधार, चांगला विचार आणि नियोजन करणारा म्हणून पुढे आला आहे, तो खूप प्रतिभावान आहे.”
“रोहितच्या आणि अजिंक्य रहाणेच्याही येण्याने विराटला दिलासा मिळाला असेल. त्याचमुळे मला वाटते धोनीला टी20 क्रिकेटमधून विश्रांती दिली असावी.”
महत्त्वाच्या बातम्या-
–उद्यापासून सिन्नर-नाशिक येथे राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डीचा थरार!
–क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या इंस्टाग्राम फाॅलोवर्सचा नंबर ऐकून तूम्ही अवाक व्हाल
–विराट म्हणतो, विश्वचषकासाठी धोनी नाही तर या खेळाडूची जागा संघात पक्की