आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (20 मे) दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने शानदार सांघिक कामगिरीचे प्रदर्शन केले. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीने संघाने 77 धावांनी मोठा विजय साजरा केला. यासह त्यांचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले. मात्र, सामना संपल्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी व अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यामध्ये वाद रंगल्याचे पाहायला मिळाले.
प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी या सामन्यात चेन्नईला विजय आवश्यक होता. चेन्नईने उत्कृष्ट खेळ दाखवत हा विजय मिळवून पहिल्या क्वालिफायरमध्ये जागा बनवली. मात्र या सामन्यानंतर धोनी व जडेजामध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये धोनी व जडेजा सामना संपल्यानंतर बाहेर येताना दिसत आहेत. त्यामध्ये धोनी काहीतरी समजावताना दिसतोय. त्यावर जडेजाची प्रतिक्रिया काहीशी रागात असल्याची दिसून येते.
Jadeja is most Egoist person. He doesn’t like MSD advice in middle of the over. MSD forever ♥️💯. Jadeja can’t even match 1% of MSD for his life time.
#MIvsSRH
#RCBvGT pic.twitter.com/yDIGQixglE— smartmobilenews (@smartmobile_new) May 21, 2023
त्यानंतर जडेजा आणि इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत लिहिले,
‘कर्म फिरून तुमच्याकडेच येते. ते उशिरा येवो अथवा लवकर पण येते.’ त्याच्या या विधानाचे अनेक उलटसुलट अर्थ काढले जात आहेत.
Definitely 👍 pic.twitter.com/JXZNrMjVvC
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) May 21, 2023
दिल्ली विरुद्धच्या सामन्यात जडेजा काहीसा महागडा ठरला होता त्यानंतर धोनी त्याला समजावताना दिसलेला. धोनी व जडेजा यांच्यामध्ये मागील वर्षे देखील वाद झाल्याचे सांगण्यात येत होते. हंगामाच्या सुरुवातीला सीएसकेचे कर्णधारपद जडेजाला देण्यात आलेले. मात्र, तो संघाला अपेक्षित यश मिळवून देऊ शकला नव्हता. त्यानंतर धोनीकडे पुन्हा नेतृत्व देण्यात आले. तेव्हा जडेजा दुखापतीचे कारण सांगत हंगामातून बाहेर पडलेला.
(Dhoni Jadeja Fight After Delhi Match Jadeja Cryptic Post Viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हिरो हिटमॅन! धुवांधार अर्धशतकासह मोठ्या विक्रमाला घातली गवसणी, पुढे फक्त विराटच
आरसीबीचा ट्रॉफीसाठी वाढला वनवास! केजीएफने प्रयत्नांची शर्थ करुनही हाती निराशाच