भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आपल्या कारकिर्दीत ‘कॅप्टन कूल’ म्हणजेच थंड डोक्याने निर्णय घेण्यासाठी ओळखला जायचा. अजूनही त्याला चाहते क्वचितच रागावलेले पाहतात. मात्र, कारकीर्दीच्या सुरुवातीला धोनी हा आपल्या फलंदाजी प्रमाणेच काहीश्या आक्रमक स्वभावाचा होता. तो अनेकदा आपली मते उघडपणे मांडत असत. याचाच प्रत्यय भारताचे माजी कर्णधार व प्रसिद्ध समालोचक आणि सध्या भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांना आला होता.
काय घडली होती घटना?
वेस्ट इंडीज येथे झालेल्या २००७ वनडे विश्वचषकात भारतीय संघ साखळी फेरीत बाद होऊन परतला होता. त्यानंतर या वर्षीच झालेल्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत पहिल्यावहिल्या टी२० विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ उतरवला. भारतीय संघाने दमदार खेळ करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
त्याच वेळी या स्पर्धेदरम्यान समालोचन करणाऱ्या रवी शास्त्री यांनी एका क्रीडा संकेतस्थळासाठी लिहिलेल्या स्तंभात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बाजूने आपला कौल दिला होता. मात्र, उपांत्य फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत अंतिम फेरीत मजल मारली. या उपांत्य फेरीनंतर पारितोषिक वितरण समारंभात शास्त्री यांनी विजयी कर्णधार धोनीला संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले.
https://twitter.com/OswalViren/status/1440561176190939143?s=19
धोनीने शास्त्री हे प्रश्न विचारणे आधीच त्यांना थांबवले आणि म्हणाला,
“रवी, मी काल एका संकेतस्थळावर वाचले की, तू उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विजय होईल असे म्हटला होता. बघ, आम्ही तुला चुकीचं ठरवलं आणि याचा सर्वाधिक आनंद तुलाच झाला असेल.”
धोनीच्या या वाक्यानंतर शास्त्री यांनी स्मितहास्य करत पुढील प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
भारताने जिंकलेला उपांत्य सामना
डर्बन येथे झालेल्या या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अष्टपैलू युवराज सिंगच्या ७०, कर्णधार धोनी व रॉबिन उथप्पा यांच्या अनुक्रमे ३६ व ३४ धावांच्या बळावर भारतीय संघाने १८८ धावा रचल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी केली. मात्र श्रीसंत, इरफान पठाण व जोगिंदर शर्मा या भारतीय वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत भारताला १४ धावांनी विजय मिळवून दिला होता. त्यानंतर, अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करत भारताने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता मेंटर बनणार युवी? प्रतिष्ठित लीगमध्ये ‘या’ संघाने दिली ऑफर
पोरींनी नाव काढलं! तब्बल 23 वर्षांनंतर इंग्लंडला लोळवत जिंकली वनडे मालिका; हरमनचा शतकी धमाका
एमएसएलटीए बी1 आशियाई कुमार टेनिस चार भारतीय खेळाडूंचा उपांत्य फेरीत प्रवेश