---Advertisement---

‘मला खेळाडूंना पुन्हा…’, सततच्या पराभवानंतरही संघात बदल न करण्याबाबत धोनीचे मोठे वक्तव्य

On: मंगळवार, ऑक्टोबर 20, 2020 3:17 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामात सोमवारी (19 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला 7 गडी राखून पराभूत केले. चेन्नईचा या हंगामातील हा 7 वा पराभव होता. मला खेळाडूंना पुन्हा खेळण्याची संधी द्यायची होती त्यामुळे संघात बदल केले नाही, असे चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने सांगितले. पुढील सामन्यात काही युवा खेळाडूंना संधी मिळेल, असेही त्याने सांगितले.

फिरकी गोलंदाजांना मिळाली नाही मदत

सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात बोलताना एमएस धोनी म्हणाला की, “वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टी अनुकूल होती. चेंडू खेळपट्टीवर थांबून येतो की नाही हे पाहण्यासाठीच मी जडेजाला गोलंदाजी करायला सांगितले, परंतु दुसऱ्या डावात चेंडू खेळपट्टीवर थांबून येत नव्हता. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजाना काहीच मदत मिळाली नाही.”

खेळाडूंना द्यायची होती संधी

प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसे बदल न करण्याचे कारण सांगताना एमएस धोनी म्हणाला की, “सामन्यादरम्यान काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. या क्षणी तुम्ही संघात बदल करू शकत नाही कारण चार-पाच सामन्यानंतर खेळाडू कशी कामगिरी करेल हे तुम्हाला ठाऊक नसते. त्यामुळे मला खेळाडूंना संधी द्यायची होती. त्यानंतर तुम्हाला निरीक्षण करायचे असते की कोणते खेळाडू खराब कामगिरी करत आहेत, त्यानंतर संघात बदल करू शकतो.”

युवा खेळाडूंना मिळेल संधी

पुढे बोलताना धोनी म्हणाला की, “आतापर्यंत आम्ही ज्याप्रकारे प्रदर्शन केले ते पाहता आता पुढील सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना संधी मिळेल. वास्तविक, त्यांच्यावर दबाव नसेलच, जेणेकरून ते चांगले प्रदर्शन करून स्वतःला सिद्ध करू शकतील. ज्या क्रमांकावर त्यांना फलंदाजी करायची आहे त्या क्रमांकावर त्यांना संधी मिळेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

-क्रिकेटमधील राजा माणूस! राजस्थानचा हुकमी एक्का जॉस बटलरला धोनीकडून खास भेट

-चेन्नईविरुद्धच्या झुंजारू खेळीदरम्यान बटलरने केला खास विक्रम; रहाणे, वॉटसननंतर ठरला तिसरा फलंदाज

-‘ही माझी शेवटची संधी…’, चेन्नईविरुद्ध केलेल्या दमदार खेळीनंतर बटलरची प्रतिक्रिया

ट्रेंडिंग लेख-

-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून

-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---