---Advertisement---

‘ही माझी शेवटची संधी…’, चेन्नईविरुद्ध केलेल्या दमदार खेळीनंतर बटलरची प्रतिक्रिया

On: मंगळवार, ऑक्टोबर 20, 2020 11:43 AM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामात सोमवारी (19 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात राजस्थानचा धडाकेबाज फलंदाज जॉस बटलर याने 70 धावांची उत्कृष्ट खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. या खेळीमुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. संघाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यास मी तत्पर आहे, असे सामन्यानंतर त्याने सांगितले.

जलदगतीने धावा काढण्याचा केला प्रयत्न

माध्यमांशी बोलताना बटलर म्हणाला की, “या सामन्यात आमचा विजय झाल्यामुळे मी आनंदी आहे. मला मिळालेली ही शेवटची संधी होती असे मला मुळीच वाटत नाही. मी आज जलदगतीने धावा काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मला यश मिळाले.”

संघाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यास तत्पर

“तुम्हाला स्वतः वर विश्वास ठेवावा लागेल आणि विशेषत: कमी धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्ही सुरुवातीला अधिक वेळ घेऊ शकता आणि त्यानंतर जलदगतीने धावा काढता येते. 5 व्या क्रमांकावर फलंदाजी केल्याचा मला आनंद आहे. संघाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यास मी तत्पर आहे. ते माझे कर्तव्य आहे,” असेही पुढे बोलताना बटलर म्हणाला.

राजस्थान गुणतालिकेत 5 व्या स्थानी

या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत केवळ 125 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थान संघाने अवघ्या 28 धावांवर 3 गडी गमावले. त्यानंतर जॉस बटलर आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या 98 धावांच्या भागीदारीमुळे राजस्थानला विजय मिळवण्यात यश आले. या विजयासह राजस्थान संघ गुणतालिकेत 5 व्या स्थानी आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-तो पहिलाच इंग्लिश मॅन.! आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी फक्त जॉस बटलरने केलीये

-स्मिथ ऐवजी बटलर बनणार कर्णधार? राजस्थान रॉयल्सने दिलंय ‘हे’ उत्तर

-‘करो या मरो’ सामन्यात राजस्थानने रोखला चेन्नईचा विजयरथ, प्लेऑफच्या आशा पल्लवित

ट्रेंडिंग लेख-

-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून

-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---