आयपीएल २०२१ मध्ये सोमवारी (१९ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ४५ धावांनी दणदणीत विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. चेन्नईचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी यष्ट्यांमागून आपल्या संघ सहकाऱ्यांना मजेशीर सूचना देताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
धोनीने कशाप्रकारे दिल्या खेळाडूंना सूचना
एमएस धोनी यष्टीरक्षण करताना नेहमी काहीतरी मजेदार बोलताना आढळून येतो. गोलंदाजांना किंवा क्षेत्ररक्षकांना तो सूचना दिसून आला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातही धोनी अशाचप्रकारे क्षेत्ररक्षण लावताना दिसला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये धोनी षटक समाप्तीनंतर क्षेत्ररक्षण लावताना, “चलो चलो जल्दी जल्दी… यार एक प्लेअर गायब हो जाता है हमेशा”, असे बोलताना दिसत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळतेय.
Listen to Ms Dhoni 😂#CSK #Dhoni #RRvCSK #cskvsrr #ipl2021 #jadeja pic.twitter.com/fCkpPLGVvd
— Pranav Bhardwaj 🇮🇳 (@pranavwrites) April 19, 2021
चेन्नईचा धमाकेदार विजय
सर्व खेळाडूंच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर चेन्नईने हंगामातील आपला दुसरा विजय साजरा करत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सर्व प्रमुख फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर चेन्नईने निर्धारित २० षटकात १८८ धावा फलकावर लावल्या होत्या.
प्रत्युत्तरात, राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवीर जोस बटलर वगळता कोणीही चेन्नईच्या गोलंदाजांचा फारसा प्रतिकार केला नाही. बटलरने ४९ धावांचे योगदान दिले. चेन्नईसाठी मोईन अलीने ३ तर, सॅम करन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ बडी आपल्या नावे करत राजस्थानचा डाव १४३ पर्यंत रोखला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मोईन अलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
नाद नाही करायचा! दोन विकेट्स चार झेल घेतल्यानंतर रविंद्र जडेजाचे हटके सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
बॅट सोड आधी धावा काढ! बॅट उडाली हवेत तरीही दोन धावा पळाला ब्रावो, पाहा गमतीशीर व्हिडिओ
सॅल्यूट माही! टी२० क्रिकेटमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेवाद्वितीय कर्णधार बनला धोनी