प्रत्येक भारतीयासाठी (१५ ऑगस्ट) हा दिवस अतिशय खास असतो. जवळपास १५० वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा हा दिवस आहे. यावर्षी देश ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. बरोबर १ वर्षापूर्वी देशात या दिवशी असेच वातावरण होते. मात्र, अचानक संध्याकाळी अशी एक बातमी आली, ज्यामुळे क्रिकेटप्रेमींचे हृदय तुटले होते. बरोबर १ वर्षापूर्वी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२० रोजी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
धोनीने नेहमीच आपल्या निर्णयांनी सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. गेल्या वर्षीही त्याने असेच काही केले. त्याने शांतपणे इन्स्टाग्रामवर एक संदेश शेअर केला आणि आपली भूमिका जाहीर केली.
त्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या फोटोंचा ‘मैं पल दो पल का शायर हूं’ या गाण्यावर व्हिडिओ बनवून पोस्ट केला होता. तसेच लिहिले होते की, “तुमच्याकडून नेहमी मिळालेले प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ नंतर मला निवृत्त समजा.”
https://www.instagram.com/p/CD6ZQn1lGBi/
धोनी नेहमी त्याच्या निर्णयांनी आश्चर्यचकित करतो
धोनी हा नेहमीच धक्कादायक निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. धोनीने लग्न देखील शांतपणे केले. तसेच त्याने २०१४ साली डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच २०१७ सालीही त्याने जानेवारीमध्ये कोणताही गाजावाजा न करता भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती अचानकपणेच स्विकारली.
Leader. Legend. Inspiration. 🙌#OnThisDay last year, #TeamIndia great @msdhoni announced his retirement from international cricket. 🇮🇳 pic.twitter.com/0R1LZ2IZyu
— BCCI (@BCCI) August 15, 2021
२०१९ च्या विश्वचषकाची उपांत्य फेरीतील धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना
धोनीला २०१९ च्या विश्वचषक उपांत्य फेरीदरम्यान निळ्या जर्सीमध्ये शेवटचे पाहिले गेले होते. मँचेस्टरमध्ये ९-१० जुलै २०१९ रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या या उपांत्य सामन्यात धोनीने ७२ चेंडूत ५० धावा केल्या. तो खालच्या फळीतील फलंदाजांसह २४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. पण मार्टिन गप्टिलच्या थ्रोवर तो धावबाद झाला. त्यावेळी चाहते निराश झाले आणि धोनीही डोळ्यात अश्रू घेऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. तेव्हाही कोणालाही कल्पना नव्हती की, तो निवृत्तीचा निर्णय घेईल.
धोनीच्या १ तासानंतर रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही निरोप
धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर लगेचच १ तासाने सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रैनानेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले होते की “माही! तुझ्यासोबत खेळायला खूप छान वाटले, आता मला पुढच्या प्रवासातही सोबत पुढे जायचे आहे.”
https://www.instagram.com/p/CD6d3QChY-V/
आयपीएलमध्ये खेळणे कायम
धोनी आणि रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी हे दोघेही चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये अद्याप खेळत आहेत. सप्टेंबरमध्ये आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामातही हे दोघे खेळताना दिसणार आहेत.
धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्द
धोनीने मागीलवर्षी १५ ऑगस्टरोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीने त्याच्या कारकिर्दीत ९० कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ६ शतकांचा आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कसोटीत धोनीच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने २०१३ सालामध्ये चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध २२४ धावांची खेळी केली होती.
तसेच धोनी सर्वाधिक वनडे सामने खेळणारा भारताचा सचिन तेंडूलकर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. धोनीने त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत ३५० वनडे सामने खेळले असून यात त्याने १० शतके आणि ७३ अर्धशतकांसह ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताकडून धोनीने ९८ टी२० सामन्यात २ अर्धशतकांसह १६१७ धावा केल्या आहेत. धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यष्टीमागे ८२९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी टोकियो आलिंपिक खेळण्याची आशा सोडलेल्या नीरज चोप्राने भावनिक पोस्ट करत मानले ‘यांचे’ आभार