टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर सध्या जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीरजने प्रथमच भारतासाठी ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक पटवून दिले. त्यामुळे नीरजचे तमाम क्रीडाक्षेत्रातील व्यक्ती आणि भारतीयांकडून कौतुक केले जात आहे.
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त नीरजने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने त्याचे प्रशिक्षक, डॉक्टर आणि फिजिओचे आभार मानले. नीरजला २०१९ मध्ये गंभीर दुखापत झाली होती. यादरम्यान या सर्वांनी त्याची खूप मदत केली होती. त्यासाठी त्याने त्यांचे आभार मानत ही पोस्ट केले.
यामध्ये नीरजने लिहिले, “मे २०१९ मध्ये हाताचा कोपरा दुखापतग्रस्त झाला होता. तेथून आज टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास हा अत्यंत अविस्मरणीय होता. मी डॉक्टर दिनेश पारदीवाला, प्रशिक्षक डॉ. क्लॉस आणि फिजिओ ईशान यांचे आभार मानू इच्छितो. या तिघांनी नेहमी माझी साथ दिली. गेल्या दोन वर्षांपासून हे लोक माझ्या सोबत आहेत. यांच्यामुळेच मी एकदम तंदुरुस्त राहू शकलो, ज्यामुळे मी सुवर्ण पदक जिंकण्यात यशस्वी झालो.”
पुढे नीरजने लिहिले, “मला आशा आहे की, माझे हे पदक त्या सर्व लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल जे सध्या कठीण काळातून जात आहेत. त्या सर्वांना माझ्याकडून भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!”
नीरज चोप्राचा २०१९ साली हाताचा कोपरा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला एका मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. ज्यामुळे त्याला खूप काळासाठी मैदानातून बाहेर राहावे लागले होते. यात डॉक्टर दिनेश पारदीवालाने नीरजची देखभाल केली होती.
या दरम्यान नीरजने टोकियो ऑलिंपिकमध्ये खेळण्याची आशा देखील सोडली होती. तो काळ नीरजसाठी खूप कठीण काळ होता. परंतु, नीरजने यासाठी खूप मेहनत घेतली, संघर्ष केला. ज्यामुळे त्याने टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला ॲथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.
महत्वाच्या बातम्या –
–“मला वाटलं आता गाणंच लावतील”, थर्ड अंपायरने ‘ती’ चूक करताच चाहत्यांनी घेतली मजा
–अभिमानास्पद! लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताच्या महिला क्रिकेटपटूला मिळाला मानाची घंटा वाजवण्याचा मान
–‘पंतच्या फलंदाजीत दिसते गिलख्रिस्टची झलक’, माजी इंग्लिश क्रिकेटपटूकडून कौतुक