---Advertisement---

अभिमानास्पद! लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताच्या महिला क्रिकेटपटूला मिळाला मानाची घंटा वाजवण्याचा मान

On: रविवार, ऑगस्ट 15, 2021 6:23 PM
---Advertisement---

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानाला मोठा इतिहास आहे. वारसा लाभला आहे. या ऐतिहासिक मैदानावरील प्रत्येक क्रिकेटचा सामना सुरू होण्यापूर्वी मैदानाच्या पॅव्हेलियनमध्ये असलेली घंटा वाजवण्याची प्रथा आहे. ही घंटा वाजवण्याचा मान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रशासक किंवा खेळ क्षेत्रात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी असणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील चौथा दिवसाचा (१५ ऑगस्ट ) खेळ देखील घंटा वाजवून सुरु केला गेला. चौथ्या दिवशी घंटा वाजवण्याचा मान भारतीय महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्माला देण्यात आला होता. ती सध्या इंग्लंडमध्येच असून द हंड्रेड लीगमध्ये खेळत आहे.

खेळ सुरु होण्यापूर्वी घंटा वाजवण्याची परंपरा २००७ पासून सुरू करण्यात आली आहे. तसेच सामन्यातील तिसऱ्या दिवशी (१४ ऑगस्ट) घंटा वाजवण्याचा मान माजी भारतीय क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांना देण्यात आला होता.

या सामन्यातील पहिले दोन दिवस भारतीय संघाच्या नावावर होते, तर सामन्यातील तिसऱ्या दिवशी (१४ ऑगस्ट) इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या चिंतेत वाढ केली होती. इंग्लंड संघाकडून कर्णधार जो रूटने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली होती. इंग्लंड संघाचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ तर ईशांत शर्माने ३ गडी बाद केले होते.(Deepti Sharma rang the bell at lord’s test before the start of day 4)

 

भारतीय संघाच्या अडचणीत  वाढ
इंग्लंड संघाने तिसऱ्या दिवस अखेर (१४ ऑगस्ट) ३९१ धावा केल्या होत्या. यासह इंग्लंड संघाने २७ धावांची आघाडी घेतली होती. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाच्या मुख्य फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. पहिल्या डावात शतक झळकावणारा केएल राहुल ५ धावा करत माघारी परतला. तर रोहित शर्मा देखील फार काळ टिकू शकला नाही. तो २१ धावा करत माघारी परतला होता.

तसेच विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भागीदारी करत भारतीय संघाला ५० धावांचा टप्पा पूर्ण करून दिला होता. परंतु कोहलीही फार काळ टिकू शकला नाही.कोहली अवघ्या २० धावा करत माघारी परतला. त्यामुळे चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने २५ षटकात ३ बाद ५६ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘पंतच्या फलंदाजीत दिसते गिलख्रिस्टची झलक’, माजी इंग्लिश क्रिकेटपटूकडून कौतुक

स्वदेश असो वा परदेश, देशप्रेम महत्त्वाचं! विराटसेनेने इंग्लंडमध्ये फडकावला तिरंगा, व्हिडिओ बघून वाटेल अभिमान

फलंदाजासाठी नाही, तर टीकाकारांना प्रतिउत्तर देण्यासाठी ‘ते’ खास सेलिब्रेशन करतो मोहम्मद सिराज, स्वत:च केलाय खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---