---Advertisement---

मॅच हारल्यावर धोनी काय करतो? त्या खेळाडूने अखेर जगाला सांगतिला धोनीचा तो ‘राज’

On: मंगळवार, एप्रिल 28, 2020 10:21 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल मोठा खुलासा केला आहे. धोनीबद्दल बोलताना मोहित म्हणाला की, आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हा धोनी एका खऱ्या कर्णधाराप्रमाणे ती स्विकारतोही. ३१ वर्षीय मोहित चेन्नई सुपर किंग्स आणि भारतीय संघाकडून धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे.

तो यावर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार होता. परंतु कोविड-१९मुळे (Corona Virus) आयपीएल (IPL) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.

मोहितने (Mohit Sharma) इंस्टाग्राम चॅट दरम्यान सांगितले की, “मी आतापर्यंत जेवढ्या खेळाडूंसोबत खेळलो आहे त्यामध्ये धोनीची (MS Dhoni) नम्रता आणि कृतज्ञतेची भावना त्याला सर्वांपेक्षा खूप वेगळं बनवते. एक कर्णधार आणि नेत्यामध्ये फरक असतो आणि माझ्यामते धोनी हा खरा नेता आहे.”

मोहित पुढे म्हणाला की, “जेव्हा संघ विजयी होतो, तेव्हा धोनी याचे श्रेय घेत नाही. परंतु जेव्हा संघ पराभूत होतो, तेव्हा त्याची संपूर्ण जबाबदारी स्विकारतो. ही एका खऱ्या नेत्याची निशानी असते. त्यामुळे मी त्याच्यावर इतका प्रभावित आहे.”

कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. यावर मोहित म्हणाला की, “जेव्हा आयपीएल होईल, तेव्हा त्याचा संघ हे विजेतेपद पटकावेल.”

पाठीच्या दुखापतीमुळे मागील १० महिने क्रिकेटपासून दूर असणारा मोहित म्हणाला की, “मी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि मागील ३ महिन्यांपासून फीटनेसवर लक्ष दिल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळण्यासाठी उत्सूक आहे. आमचा संघ मजबूत आहे. तसेच आमच्याकडे प्रत्येक विभागात चांगले खेळाडू आहे. ज्यामुळे आम्ही या विजेतेपदासाठी चांगले आव्हान निर्माण करू शकतो.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-१९८३ व २०११ क्रिकेटविश्वचषकाच्या बक्षीसाच्या रकमा आहेत विचार करायला लावणाऱ्या

-वनडेमधील आजपर्यंतची सार्वकालीन आयसीसी क्रमवारी, पहिल्या विसात केवळ ३ भारतीय

-धोनी- विराटची २०१९सालची कमाई आली जगासमोर, कमी सामने खेळूनही धोनी आहे…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---