fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

धोनीला क्रिकेटमधून कमवायचे होते फक्त ३० लाख रुपये

मागील १५ वर्षांपासून आजपर्यंत भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला दिग्गज खेळाडूंमध्ये गणले जाते. परंतु धोनीने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती तेव्हा त्याला खूप काही मिळवायचे होते.

धोनीबद्दल त्याचा माजी संघसहकारी तसेच रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्याचबरोबर धोनीशी निगडीत ड्रेसिंग रुममधील काही सिक्रेट्सही जाफरने शेअर केले आहेत.

झारखंड संघाकडून खेळताना २००४मध्ये धोनीची आणि जाफरची मैत्री झाली. यादरम्यान धोनी (MS Dhoni) जाफरला म्हणाला होता की, त्याला क्रिकेट खेळून जास्तीत जास्त ३० लाख रुपये (30 Lakh Rupees) कमवायचे आहेत. जेणेकरून त्याला आरामात आपल्या रांची शहरात राहता येईल.

एका चाहत्याने जाफरला त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर प्रश्न विचारला होता की, धोनीबद्दल तुझ्या खास आठवणी कोणत्या आहेत? यावर जाफर उत्तर देत म्हणाला की, “भारतीय संघाबरोबर खेळताना मला आठवते की, धोनी मला म्हणाला होता की, त्याला फक्त ३० लाख रुपये कमावून आपले शहर रांचीमध्ये रहायचे होते.”

सध्या धोनीची एकूण संपत्ती ही सध्या ८०० कोटी इतकी आहे. तो जगातील एक श्रीमंत क्रि्केटर म्हणून ओळखला जातो.

धोनीने भारतीय संघाला २००७ मध्ये टी२० विश्वचषक, २०११मध्ये वनडे विश्वचषक मिळवून दिले आहे.

धोनी आयपीएलमधून ८ महिन्यांनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे धोनीच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-क्रिकेटचे फॅन्स आहात! ही आहे आजची सर्वात मोठी गुड न्यूज

-क्रिकेटमधील अशा ५ बॅट्स, ज्यांच्यामुळे झाले होते मोठे वाद

-रोहितसह हे ३ फलंदाज टी२० क्रिकेटमध्ये करु शकतात द्विशतक

You might also like