---Advertisement---

योग्य ठिकाणी गाडी पार्क न केल्यामुळे धोनीची पत्नी नाराज; पहा व्हिडिओ

On: मंगळवार, मार्च 17, 2020 5:31 PM
---Advertisement---

काल ( १६ मार्च) भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये धोनीने त्याची बाईक योग्य ठिकाणी पार्क न केल्यामुळे साक्षी नाराज असल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओत सरळ दिसून येत आहे की धोनीने चुकीच्या ठिकाणी म्हणजेच दरवाजासमोरच त्याची गाडी लावली आहे.

त्याच्या या वागणूकीमुळे साक्षी धोनीवर चिडली आणि रागात तिने धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केला. या व्हि़डिओतून साक्षीला धोनीला हे सांगायचे आहे की त्याने गाडी योग्य ठिकाणी पार्क करायला हवी.

https://twitter.com/PRINCE3758458/status/1239592077509312514

धोनीने २०१९च्या विश्वचषकात चांगली खेळी केली होती. तसे तर सर्वांना वाटत होते की तो या विश्वचषकानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, मात्र अजूनही त्याने या संदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच, २०१९च्या विश्वचषकानंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही.

धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणार होता. मात्र, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने आयपीएल २०२० १५ एप्रिलपर्यंत स्थगित केले आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

आयपीएलच्या संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…

राजस्थान रॉयल्सला बसला मोठा धक्का; गोलंदाजाचा झाला भीषण अपघात

आयपीएलचे आयोजन होणार एकाच शहरात?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---