पुणे (28 मार्च 2024) – आजचा तिसरा सामाना धुळे विरुद्ध धाराशिव यांच्यात झाला. धुळे संघाने पहिला सामना मोठ्या फरकाने जिंकला होता तर धाराशिव संघाने रेलीगेशन फेरीतील पहिला समान गमावला होता. धुळे संघाकडून अक्षय पाटील ने पहिल्याच चढाईत गुण मिळवत संघाचे खात उघडला होता. तर धुळे संघाच्या दुसऱ्या चढाईत जैवर्धन गिरासे ने सूपर रेड करत संघाला 4-0 अशी सुरुवात करून दिली. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला धुळे संघाने धाराशिव संघाला ऑल आऊट करत 9-0 अशी आघाडी मिळवली.
धुळेच्या अक्षय पाटील आज पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत संघाला गुण मिळवून दिले. संघाची आघाडी वाढवली. मध्यंतरापूर्वी पुन्हा एकदा धाराशिव संघाला ऑल आऊट करत आघाडी वाढवली. मध्यंतराला धुळे संघाकडे 31-06 अशी निर्यायक आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतरही धुळे संघाने आपला आक्रमक प्रवित्रा कायम ठेवत सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. अक्षय पाटील ला जैवर्धन गिरासे ने चांगली साथ दिली. तर बचवाफळीमध्ये राज कुंवर व वैभव बोरसे यांनी चमक दाखवली.
संपूर्ण सामन्यात धुळे संघाने धाराशिव संघाला 6 वेळा ऑल आऊट करत 73-17 आता मोठा विजय मिळवत रेलीगेशन फेरीतील दुसरा विजय मिळवला. अक्षय पाटील ने चढाईत सर्वाधिक 24 गुण मिळवले. तर जैवर्धन गिरासे ने 8 गुण मिळवले. धुळे संघाच्या बचावफळीने उत्कृष्ट खेळ करत 16 पकडीत गुण मिळवले. राज कुंवर व वैभव बोरसे यांनी हाय फाय पूर्ण करत पकडीत प्रत्येकी 5 गुण मिळवले. धाराशिव कडून अनिकेत भारती ने अष्टपैलू खेळ करत 8 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- अक्षय पाटील, धुळे
बेस्ट डिफेंडर- राज कुंवर, धुळे
कबड्डी का कमाल- अक्षय पाटील, धुळे
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 । सहकाऱ्यांमध्ये धोनीविषयी प्रचंड आदर, सामन्याला सुरुवात करण्याआधी वेगवान गोलंदाजाने घेतला आशिर्वाद
IPL 2024 मध्ये हार्दिकचा सलग दुसरा पराभव, 278 धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईचीही मोठी धावसंख्या