---Advertisement---

IPL 2024 मध्ये हार्दिकचा सलग दुसरा पराभव, 278 धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईचीही मोठी धावसंख्या

---Advertisement---

मुंबई इंडियन्सला बुधवारी (27 मार्च) सनरायझर्स हैदराबाद संघाकडून 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. उप्पलमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाज करताना 3 बाद 277 धावा केल्या. आयपीएल इतिहासात ही एखाद्या संघआने केलेली सर्वोत्तम धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात मुंबई संघ 20 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर 246 धावांपर्यंत मजल मारू शकला.

278 धावांचे लक्ष्य गाठताना मुंबई इंडियन्ससाठी तिलक वर्मा याने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. वरच्या फळीतील सलामीवीर रोहित शर्मा 26, ईशान किशन 34, तर नमन धीर 30 धावा करून बाद झाले. कर्णधार हार्दिक पंड्या याने 24 धावा करून विकेट गमावली. टीम डेव्हिड 42*, तर रोमारिओ शेफर्ड 15* धावासह शेवटपर्यंत नाबाद राहिले. जयदेव उनाडकट आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या, तर शाहबाझ अहमद याला एक विकेट मिळाली.

तत्पूर्वी हैदराबादने नाणेफेक गमावल्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. पण मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने घेतलेला हा निर्णय त्यांच्या संघाला महागात पडला. हैदराबादचा सलामीवीर ट्रेविस हेड याने सुरुवातीपासूनच धमकादेरा खेळ सुरू केला. हेडने 24 चेंडूत 62 धावा केल्या, तर अभिषय शर्मा याने 23 चेंडूत 63 धावा केल्या. ऍडेन मार्करम चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 42* धावा केल्या. हेनरिक क्लासेन याने 34 चेंडूत 80* धावा केल्या.

हार्दिक पंड्या, जेराल्ड कोएत्झी आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. क्वेना मफाका जसप्रीत बुमराह आणि शम्स मुलानी यांना एकही विकेट मिळाली नाही, ज्याचा परिणाम म्हणून हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली. मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल हंगामातील हा सलग दुसरा पराभव ठरला, तर सनरायझर्स हैदराबादसाठी पहिला विजय होता. उभय संघांतील या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण 523 धावा केल्या. आयपीएल इतिहासात एका सामन्यात झालेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
सनरायझर्स हैदराबादः मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
इम्पॅक्ट प्लेअर्स: नितीश कुमार रेड्डी, ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव

मुंबई इंडियन्स: ईशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.
इम्पॅक्ट प्लेअर्स: डेवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, नेहल वढेरा, विष्णू विनोद

महत्वाच्या बातम्या – 
हैदराबादपुढे सगळे सपाट! 20 षटकात 277 धावा कुटल्या आणि मोडला आरसीबीचा महाविक्रम
IPL 2024 । मुंबई-हैदराबाद पहिल्या विजयासाठी आमने-सामने, हार्दिकने टॉस जिंकताच प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---