भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिद्वंद्वी संघात रविवारी (२८ ऑगस्ट) आशिया चषक २०२२ मधील हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. कारण याच प्लेइंग इलेव्हनसह भारत ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषकातही खेळेल अशी अपेक्षा आहे.
परंतु पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) बहुप्रतिक्षित सामन्याच्या २ दिवसांपूर्वीच बीसीसीआयने (BCCI) भारताची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळे चाहत्यांमध्ये (BCCI Hinted India’s Playing Xi) अशी चर्चा रंगली आहे.
बीसीसीआयने शुक्रवारी (२६ ऑगस्ट) भारतीय संघाच्या दुबईत सुरू असलेल्या नेट सेशनमधील काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘भारतीय संघाचा सराव सुरू आहे आणि आमचे कॅमेरा त्यांचे फोटो क्लिक करत आहे.’
या इंस्टाग्राम पोस्टमध्ये एकूण १० फोटो आहेत. ज्यावरून चाहते असा अंदाज व्यक्त करत आहेत की, या पोस्टद्वारे बीसीसीआयने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल संकेत दिले आहेत. या पोस्टमध्ये, उपकर्णधार केएल राहुल, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, यष्टीरक्षक रिषभ पंत, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि अर्शदीप सिंग आहेत.
https://www.instagram.com/p/Cht9pN8Pj5r/?utm_source=ig_web_copy_link
या पोस्टखाली कमेंट करत एका चाहत्याने लिहिले आहे की, “मला वाटते की, ही भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यासाठीची प्लेइंग इलेव्हन आहे.” तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले आहे की, “या फोटोंद्वारे बीसीसीआयने भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संकेत दिले आहेत.” तर काहींनी मजेत लिहिले आहे की, “भारताची प्लेइंग इलेव्हन फुटली.” “बीसीसीआयने आधीच भारताची प्लेइंग इलेव्हन सांगून टाकली, धन्यवाद.”
दरम्यान वरील ११ खेळाडूंबरोबरच भारतीय संघात दीपक हुड्डा, रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि रवी बिश्नोई हे खेळाडूही आहेत. तसेच राखीव खेळाडू म्हणून श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चाहर यांनाही जोडण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आठ तासांत कसोटीत त्रिशतक करणारे जगातील एकमेव फलंदाज, ४६ चौकारांचा दिला गोलंदाजांना प्रसाद
फलंदाजीमध्ये ९९.९४ची जबरदस्त सरासरी असलेल्या ब्रॅडमन यांना ‘या’ गोलंदाजानी दिला सर्वाधिक त्रास
क्रिकेटच्या ‘महायुद्धा’पूर्वी पाकिस्तानला आणखी एक झटका; प्रमुख खेळाडू स्पर्धेबाहेर