टीम इंडियाने ((Team india) दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर 608 धावांचे प्रचंड लक्ष्य ठेवले आहे. यजमान इंग्लंडची अवस्था खूपच खराब झाली असून केवळ 106 धावांवर त्यांचे 5 फलंदाज तंबूत परतले आहेत. भारतीय संघाने दुसरा डाव 427 धावा बनवल्यानंतर घोषित केला. पहिल्या डावात 180 धावांची मोठी आघाडी मिळाल्यानंतरही संघ व्यवस्थापनाने दुसरा डाव जाहीर करण्यात केलेला विलंब अनेकांच्या लक्षात न बसलेला निर्णय ठरला. चौथ्या दिवशी टी-ब्रेकनंतरही भारतीय संघाने एक तास फलंदाजी केली होती. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांनी डाव उशिरा घोषित करण्यामागचं कारण सांगितलं.
मॉर्ने मॉर्कल (Morne Morkel) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं, डाव घोषित करण्यावर दिवसभरात बराच विचारविनिमय झाला. आमचे फलंदाज शेवटीही अगदी सहज फलंदाजी करत होते. आमचे फलंदाज 4-5 धावांच्या सरासरीने धावा करत होते. हवामानावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. आम्हाला स्वतःला आरामदायक स्थितीत ठेवायचं होतं आणि त्यांना 20-25 षटके फलंदाजीला लावून काही विकेट्स घेण्याचा विचार होता. आम्ही ते करण्यात यशस्वी ठरलो, ही गोष्ट आमच्यासाठी
चांगली ठरली.
पहिल्या डावात 269 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावातही शुबमन गिलने (Shubman gill) जबरदस्त फलंदाजी केली. गिलने 162 चेंडूंमध्ये 161 धावांची शानदार खेळी केली. या दरम्यान त्याने 13 चौकार आणि 8 षटकार ठोकले. शुबमन गिल एकाच कसोटी सामन्यात 400 पेक्षा जास्त धावा करणारा आशियातील पहिला फलंदाज ठरला. गिलसोबत रिषभ पंतनेही (Rishbh Pant) दमदार खेळी केली आणि त्याने 58 चेंडूंमध्ये 65 धावा फटकावल्या. तसेच रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 69 धावा करून नाबाद राहिला. भारतीय संघाने दुसरा डाव 427 धावा करून घोषित केला आणि इंग्लंडसमोर 608 धावांचं आव्हान ठेवलं.






टी20 वर्ल्डकप 2026: एमएस धोनी करणार का कमेंट्री? माजी कर्णधारने दिला थेट उत्तर