इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाला खरोखरच त्यांचा परफेक्ट कर्णधार मिळाला आहे का? की अजूनही त्यामध्ये शंका आहे? त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 8 विकेट्सने पराभूत झालेल्या लखनऊ संघावर खूप प्रश्न उपस्थित केले गेले. तेव्हा संघाचे मालक संजीव गोयंका यांनी समोर येऊन त्यांच्या संघाचा कर्णधार ऋषभ पंतला पाठिंबा दिला आहे. त्यांनी फक्त पंतच्या कर्णधार पदावरच विश्वास दाखवला नाही, तर ते हे देखील म्हटले की त्याने अजून सर्वश्रेष्ठपणे संघाचं प्रतिनिधित्व करणे बाकी आहे.
गोयंका यांनी स्टार स्पोर्ट्स सोबत बोलताना स्पष्ट म्हटले की, ज्यावेळी आम्हाला कळले की रिषभ रिटर्न होणार नाही तेव्हा आम्ही आमच्या संघात त्याला घेण्याचा निर्णय घेतला. मी आधीही म्हटलं आहे आणि मी आता परत म्हणतो की, मला त्याच्या प्रतिनिधीत्व करण्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याने त्याचं कर्णधार पद सर्वोत्तम भूषवणे अजून बाकी आहे. ते पुढे म्हणाले की, आम्ही त्याला 27 करोड मध्ये खरेदी केले आहे. जर 28 करोड सुद्धा द्यायला लागले असते तर ते सुद्धा आम्ही दिले असते.
पंजाब किंग्स विरुद्ध सामन्यात ऋषभ पंत काही खास खेळू शकला नाही त्याने फक्त दोन धावा केल्या. संघाचं टॉप ऑर्डर सुद्धा त्या दिवशी ढासळलेलं पाहायला मिळालं. मिचेल मार्श पहिल्याच चेंडूत बाद झाला, पण नंतर निकोलस पुरनने (44), आणि आयुष बडोनी (41) दोघांनी मिळून 65 धावांची भागीदारी रचली. तसेच शेवटच्या षटकात डेव्हिड मिलर आणि अब्दुल समद यांनी चांगली कामगिरी केली. लखनऊने 171 धावा केल्या. जी धावसंख्या पंजाबच्या फलंदाजांसमोर खूप कमी ठरली.
पंजाब किंग्स कडून प्रभसिमरन सिंगने 34 चेंडूत 69 धावा केल्या. तसेच श्रेयस अय्यरने नाबाद (52) धावा आणि नेहाल वडेराने (43) नाबाद धावा केल्या. शानदार फलंदाजी करत 16.2 षटकात त्यांनी आव्हान पूर्ण केलं. या पराभवानंतर लखनऊ संघ पॉइंट्स टेबल मध्ये सहाव्या स्थानी पोहोचला आहे.