किंग्ज इलेव्हन पंजाबचे आयपीएल 2018 मधील आव्हान जरी संपुष्टात आले असले तरी एका कारणामुळे पंजाब संघाची सहमालकीण प्रीती झिंटा मात्र खुष असल्याचे दिसुन आले आहे.
रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामना पार पडला. या सामन्यादरम्यानचा प्रीती झिंटाचा एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर वायरल होत आहे.
या व्हिडिओला आवाज नसला तरी प्रीतीच्या ओठांच्या हालचालींवरुन असे लक्षात येते की ती शेजारी उभ्या असणाऱ्या व्यक्तीला सांगत आहे की मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आल्याने खुष आहे.
या व्हिडिओतील तिचे वाक्य नक्की काय आहे, याबाबत ट्विटरवर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
Did #PreityZinta just say “I am just very happy that Mumbai is not going to the finals..Really happy” 🤔 #CSKvKXIP #MIvsDD #IPL #IPL2018 pic.twitter.com/KWaxSUZYZh
— Jo (@jogtweets) May 20, 2018
I guess she said…"I'm just very happy that Mumbai is knocked out…very happy"
— Adarsh (@Whatev_bru) May 20, 2018
https://twitter.com/imRMehra/status/998248583890518016
https://twitter.com/sohamgh9/status/998301018214486016
रविवारी दोन सामने झाले. पहिला सामना मुंबई विरुद्ध दिल्ली असा झाला, तर दुसरा सामना चेन्नई विरुद्ध पंजाब झाला.
मुंबई आणि पंजाब दोन्ही संघांना आयपीएल प्ले-आॅफला पात्र ठरण्याची संधी होती. मात्र त्यासाठी मुंबई आणि पंजाब दोन्ही संघांना विजय आवश्यक होता.
पण त्याचबरोबर पंजाबला प्ले-आॅफला पात्र ठरण्यासाठी मुंबईचा पराभव होणेही गरजेचे होते.
पहिल्या सामन्यात मुंबई पराभूत झाल्याने मुंबईचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे पंजाबचा प्ले-आॅफसाठीचा एक अडथळा दूर झाला होता. याच कारणामुळे कदाचीत प्रीतीने खुष असल्याचे म्हटले असावे.
पण तिचा हा आनंद काही काळच टिकला, कारण पंजाबलाही चेन्नई विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागल्याने आयपीएलमधून आपला गाशा गुंडाळावा लागला..
याबद्दल निराशा झाल्याचे ट्विट प्रीतीने केले आहे. तसेच तिने या ट्विटमध्ये आयपीएल प्ले-आॅफला पात्र ठरलेल्या संघांचे अभिनंदनही केले आहे.
Disappointed in the loss tonight but Congrats #csk #srh #rr & #kkr for making it to the playoffs 👍Its always tough when you leave it till the last game. Next year we will come back stronger @lionsdenkxip #CSKvsKXIP
— Preity G Zinta (@realpreityzinta) May 20, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनीच आहे आयपीएलमधील सर्वात हुशार विद्यार्थी, सर्व परीक्षेत १०० पैकी १०० गुण
–एका मुंबईकराने दुसऱ्याला पराभूत करत तिसऱ्या मुंबईकरासाठी खुली केली प्ले-आॅफची दारं
–सिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी !
–२० वर्षाच्या रिषभ पंतने आज जे केले ते अनेकांना ११ आयपीएलमध्ये करता आले नाही
-केवळ १ षटकारामुळे हुकला आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम