माजी फिरकीपटू शेन वाॅर्नने आपले देशावर किती प्रेम आहे, हे दाखविण्यासाठी ‘बॅगी ग्रिन कॅप’ घालण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना तसेच ऑस्ट्रेलियन नागरिकांना ‘बॅगी ग्रिन कॅप’चे विशेष कौतुक असते.
“माझ्याकडे सतत माझी ‘बॅगी ग्रिन कॅप’ असायची. आम्ही कसोटी सामन्यात पहिल्या १ तासात ती घालत असू. तसेच ड्रेसिंग रुममध्येही ती माझ्या समोर असायची. परंतु ती कॅप घातली म्हणजे तुम्ही खरे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू असा होत नाही किंवा तुमचे तुमच्या क्रिकेटवर किती प्रेम आहे हे देखील सिद्ध होतं नाही, ” असे वाॅर्नने एका रेडियो चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
Shane Warne's baggy green cap has sold, with the last visible bid at $1,007,500 before the auction closed on Friday morning.#TheProjectTV https://t.co/0qmwi3wBd5 pic.twitter.com/QcWfZGBe45
— The Project (@theprojecttv) January 10, 2020
“मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे व मला त्या कॅपबद्दल जे काही कौतुक केले जाते, आदर्शवाद मांडला जातो, त्याचे काही विशेष वाटत नाही. मी सतत व्हाईट फ्लाॅपी किंवा ग्रीन फ्लाॅपी घालुन क्रिकेट खेळलो आहे. याचाही अर्थ असाच होतो की मी क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठीच खेळलो आहे,” असेही तो पुढे म्हणाला.
काही दिवसांपुर्वीच वाॅर्नने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव वाॅला खडे बोल सुनावले होते. तेव्हा वाॅने “खेळाडूंनी कसोटी सामन्यात पहिल्या १ तासासाठी बॅगी ग्रिन कॅप घातली पाहिजे” असे म्हटले होते.