अॅटलेटिको माद्रिदने रियल माद्रिदला ४-२ असे पराभूत करत युरो सुपर लीगचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात पहिल्याच ४९व्या सेंकदात दिएगो कोस्टाने गोल करत अॅटलेटिकोला चांगली सुरूवात करून दिली. हा गोल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक जलद गोल ठरला.
सुपर लीगचे सामने चॅम्पियन लीग आणि युरोपा लीग जिंकलेल्या संघामध्ये होतात. तसेच रियल पहिल्यांदाच स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो आणि मॅनेजर झिनादीन झिदानशिवाय असा महत्त्वाचा सामना खेळले.
यावेळी रियलकडून करिम बेनझेमाने २७व्या मिनिटाला गोल करत सामना पहिल्या सत्रात १-१ असा बरोबरीत आणला. दुसऱ्या सत्रात सरियो रामोसने ६३व्या मिनिटाला केलेल्या पेनाल्टीने रियल २-१ असा आघाडीवर होता.
⏱ 120+' | 2-4 | FULL-TIME IN TALLINN. WE ARE SUPER CUP CHAMPIONS OF EUROPE!!!!
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆#RealMadridAtleti #AúpaAtleti #SuperCup pic.twitter.com/HgCON0y7mM— Atlético de Madrid (@atletienglish) August 15, 2018
दुसऱ्या सत्रात अॅटलेटिकोचा खेळ संथ झाला होता. पण कोस्टाने ७९व्या आणि सौल निग्युझ ९८व्या मिनिटाला गोल करत अॅटलेटिकोला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. तर कोकेने १०४व्या मिनिटाला गोल करत संघाचे तिसरे सुपर लीगचे विजेतेपद पक्के केले.
तसेच रियलने अॅटलेटिकोला २०१४ आणि २०१६ला युरो चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्यात पराभूत केले होते तर २०१५ आणि २०१७ला स्पर्धेतून बाद केले होते.
मे महिन्यात झालेल्या चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्यात रियलने लीव्हरपूलचा ३-१ असा पराभव केला होता. यावेळी गॅरेथ बेलने दोन गोल केले होते. पण या सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक झाली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–क्रोएशियाच्या या तिसऱ्या फुटबॉलपटूचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला बाय-बाय…
–वाढदिवस विशेष- कसोटी क्रिकेट गाजवलेल्या चंद्रपाॅलबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी