बुधवारी (७ जुलै) रोजी सकाळी भारतीयांसाठी एक वाईट बातमी समोर आली. देशातील एक प्रसिद्ध व्यक्ती आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले. बराच काळ आजारी असलेले दिलीपकुमार हे ९८ वर्षांचे होते. त्यांनी बुधवारी (७ जुलै) सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील शेवटचा दुवाही निखळला.
दिलीप कुमार यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक संस्मरणीय चित्रपटांत काम केले. प्रत्येकाने त्यांची कारकीर्द रुपेरी पडद्यावर पाहिली. परंतु, कॅमेर्यासमोर आपली कामगिरी दाखवणार्या या दिग्गज व्यक्तीने क्रिकेटच्या मैदानातही आपली चमक दाखवली होती. त्यांनी खेळलेल्या सामन्याची काही क्षणचित्रे आता सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागली आहेत.
दिलीप कुमार खेळले होते क्रिकेटचा सामना
भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठे व्यक्तिमत्त्व असलेले दिलीप कुमार व राज कपूर हे सन १९६२ मध्ये चित्रपट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निधी जमवण्यासाठी आपापसात एक चॅरीटी सामना खेळले होते. या दिग्गज कलाकारांच्या सोबतीला त्यावेळचे प्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर, प्रेम नाथ, जॉय मुखर्जी, जबिन जलील व मनोज कुमार हेदेखील या सामन्यात सहभागी झालेले. या सर्व पुरुष कलाकारांच्या सोबतीला वहिदा रहमान व शुभा खोटे या महिला अभिनेत्रीने देखील उपस्थिती लावली होती. या सामन्यात राज कपूर यांच्या संघाने दिलीप कुमार यांच्या संघावर विजय मिळवला होता.
https://www.youtube.com/watch?v=pI4Glp7D0QM
क्रिकेटशी होते जवळचे नाते
दिवंगत दिलीप कुमार यांचे क्रीडा जगताशी जवळचे नाते होते. ते अनेकदा क्रिकेट, हॉकी व फुटबॉलच्या सामन्यांना उपस्थिती लावताना दिसायचे. भारतीय संघाने जिंकलेल्या १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचे प्रमुख खेळाडू यशपाल शर्मा यांना संघात निवडण्याची शिफारस दिलीप कुमार यांनीच केली होती. यशपाल यांनीदेखील विश्वास सार्थ ठरवत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली व शाहिद आफ्रिदी यांच्यासारखे अनेक क्रिकेटपटूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तू जळकुकडा आणि वैफल्यग्रस्त आहेस’, धोनीच्या वाढदिवशी गंभीर आला चाहत्यांच्या निशाण्यावर
धोनी वाढदिवस विशेष: जगात कुणालाही माहीचे ‘हे’ ५ विक्रम मोडणे केवळ अशक्य
क्रिकेट जगतातून दिलिप कुमार यांना श्रद्धांजली; विराट, सचिनसह या खेळाडूंचे भावनिक ट्विट