भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यात युवा भारतीय सलामीवीर शुबमन गिल याच्यावर अनेकांचे लक्ष असणार आहे. सध्या स्वप्नवत फॉर्ममध्ये असलेल्या गिल याच्याकडून भारतीय संघालाही अपेक्षा असतील. या सर्व पार्श्वभूमीवर भारताचे माजी कर्णधार व माजी निवडसमिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
गिल याच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलताना आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलताना वेंगसरकर म्हणाले,
“शुबमन गिल हा उमदा क्रिकेटपटू आहे. आम्हाला त्याच्याकडून खूप आशा आहेत. त्याच्यामूळे भारताचे खूप उज्ज्वल भविष्य आहे. तो अतिशय कुशल खेळाडू असून, भारतासाठी दीर्घ कालावधीसाठी खेळण्याचे इतर सर्व आवश्यक गुण त्याच्यामध्ये दिसतात. तो मॅचविनर म्हणून विकसित झाला आहे.”
वेंगसरकर यांनी या मुलाखतीत त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीचे देखील कौतुक केले. वेंगसरकर हे भारताच्या वरिष्ठ संघाचे निवड समिती अध्यक्ष असतानाच त्यांनी विराट कोहली याला संधी दिली होती.
भारताचा 23 वर्षीय शुबमन गिल याच्यासाठी 2023 हे वर्षे कारकीर्दीतील सर्वोत्तम वर्षे ठरले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने शतक झळकावले आहे. तसेच, त्याने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातही सर्वाधिक 890 धावा चोपत ऑरेंज कॅप (Orange Cap) आपल्या नावावर केली होती.
डब्ल्यूटीसी अंतिम सामना
डब्ल्यूटीसी अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी खेळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या सायकलमध्ये भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागलेला. तर ऑस्ट्रेलिया यावेळी पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी खेळणार आहे. दोन्ही संघांनी ही एक ट्रॉफी वगळता सर्व आयसीसी स्पर्धा आपल्या नावे केल्या आहेत.
(Dilip Vengsarkar Praised Shubman Gill Said He Is Complete Batter)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?