बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने 9 बाद 285 धावा केल्या होत्या..
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
या डावात इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टक कुकला स्वस्तात बाद करत आर अश्विनने भारताला चांगली सुरवात करुन दिली. तर पहिल्या दिवस अखेर भारताने दमदार गोलंदाजी करत इंग्लिश फलंदाजांना कमी धावसंख्येत रोखले आहे.
भारताकडून या डावात पहिल्या दिवसाखेर आर अश्विनने 60 धावात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
अश्विनच्या या कामगिरी मध्ये यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचाही मोलाचा वाटा आहे.
यामध्ये पहिल्या दिवशी दिनेश कार्तिकने यष्टीमागून आर अश्विन गोलंदाजी करताना तामिळ भाषेत मोलाचे सल्ले दिले.
कार्तिक सातत्याने अश्विनला चेंडू वळत नसल्याने पॅड वर गोलंदाजी करण्यास सांगत होता. पॅडवर गोलंदाजी केल्यास अश्विनला विकेट मिळवण्यात यश येईल असेही कार्तिक म्हणत होता.
त्यानंतर अश्विनने इंग्लंडच्या फलंदाजांना पहिल्या दिवशीच्या खेळात चांगलेच अडचणीत आणले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-म्हणूनच पुजारा पहिल्या कसोटीसाठी संघात हवा होता
-माईक ड्राॅप ते बॅट ड्राॅप- काय आहे कोहली रुटमधील ‘बॅट ड्रॉप’ सेलिब्रेशन